'शिक्षकांना परत त्रासात ढकलू नका', पंकजा मुंडेंचं ठाकरे सरकारला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 08:43 PM2020-02-07T20:43:59+5:302020-02-07T20:44:42+5:30

राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत

Pankaja Munde's advice to Thackeray govt, dont trouble to teacher | 'शिक्षकांना परत त्रासात ढकलू नका', पंकजा मुंडेंचं ठाकरे सरकारला आवाहन

'शिक्षकांना परत त्रासात ढकलू नका', पंकजा मुंडेंचं ठाकरे सरकारला आवाहन

Next

मुंबई - माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आपल्या ट्विटर अकाऊटवरुन सत्ताधाऱ्यांना टार्गेट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथे पंकजा यांनी मराठवाड्यातील पाणीप्रश्नावरुन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्यानंतरही, 12 फेब्रवारीपासून मुंबईतील कार्यायल सुरू करणार असल्याचं जाहीर करत सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक राहणार असल्याचं पंकजा यांनी म्हटलंय. आता पंकजा यांनी शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न उचलून धरला आहे.
 
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेत सुधारणांच्या दृष्टीने राज्य शासनाने राज्यस्तरीय अभ्यास गट 4 फेब्रुवारी रोजी गठीत केला आहे. या गटातील सदस्यांना त्यांचा अहवाल त्वरित 11 फेब्रुवारी रोजी शासनास सादर करावा लागणार आहे. यामुळे या ऑनलाइन बदल्यांमध्ये सुरू असलेला घोळ मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन पंकजा यांनी सरकारवर टीका केली आहे.  
 ''शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या हा विषय डायरेक्ट जनतेतून सरपंच, जलयुक्त शिवार सारखा महत्वाचा आणि लोकप्रिय आहे. जो गरीब आहे, ज्याचा वशिला नाही त्यालाही अधिकार असावेत. यांसारखे निर्णय रद्द करण्यापेक्षा सर्व विभागांनी त्यांना रेप्लिकेट करावे. विद्यादानाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांना कायमचं त्रासातून मुक्त केले आहे, त्यांना परत सरकारने यात ढकलू नये,'' असे पंकजा यांनी ट्विट करुन म्हटले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या विविध कारणांनी गाजत आहेत. या संगणकीय ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेतील विविध समस्या दूर करून त्या सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा राज्यस्तरीय अभ्यास गट अहवाल तयार करून राज्य शासनास शिफारस करणार आहे. या राज्यस्तरीय अभ्यास गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांच्यावर आहे. तर, सदस्य सचिवपदी रायगडचे सीईओ दिलीप हळदे आणि सदस्य म्हणून चंद्रपूरचे सीईओ राहुल कर्डिले, नंदुरबारचे सीईओ राहुल गौडा आणि उस्मानाबादचे सीईओ डॉ. संजय कोलते या पाच अधिकाऱ्यांचा हा अभ्यास गट गठीत केला आहे.


 

Web Title: Pankaja Munde's advice to Thackeray govt, dont trouble to teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.