Join us

'हे' खपवून घेणार नाही, पंकजांचा पालकमंत्री धनंजय मुडेंना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 10:29 PM

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पाटोदा रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग

बीड - जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरपंच पांडुरंग यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पंकजा मुंडेंनी ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. तसेच, सत्ता नसली तरी पुण्याई अन् हिंमत आहे. सामाजिक न्याय करा, इथे अन्याय चालत नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंना लक्ष्य केलंय. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पाटोदा रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पांडुरंग नागरगौजे यांनी मारहाण करणारे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलंय. त्यानंतर, आता स्वत: पंकजा मुंडेंनीही या घटनेची दखल घेतल ट्विट करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. बीड जिल्ह्यातील शांतता आणि सुख कायम राहावं असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो अशी भावना होती. पण, सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाहीत. माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, दबाव, दहशत हेच ध्येय पालकमंत्र्यांचं दिसतंय. मात्र, हे खपवून घेतलं जाणार नाही, असेही पंकजा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली म्हणून मारहाण करण्यात आली असा दावाही या कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्ट टाकून केला आहे. तसेच फेसबुकवर पोस्ट टाकून सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना धमकीही देण्यात आली. 'धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायची लायकी नाही. लायकीनुसार बोलं नाहीतर थेट 302 करण्याची धमकी देण्यात आली.

 

टॅग्स :पंकजा मुंडेबीडधनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेसट्विटर