मालवणीतील पाणपोई बनली गर्दुल्ल्याचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:07 AM2021-04-09T04:07:15+5:302021-04-09T04:07:15+5:30

मुंबई: मालवणीतील एक पाणपोई सध्या गर्दुल्ल्याचा अड्डा बनली आहे. त्यामुळे याबाबत पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देत ही समस्या ...

Panpoi in Malvani became the base of Gardulla | मालवणीतील पाणपोई बनली गर्दुल्ल्याचा अड्डा

मालवणीतील पाणपोई बनली गर्दुल्ल्याचा अड्डा

Next

मुंबई: मालवणीतील एक पाणपोई सध्या गर्दुल्ल्याचा अड्डा बनली आहे. त्यामुळे याबाबत पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देत ही समस्या सोडवावी, अशी विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मालवणीच्या वार्ड क्रमांक ४८ मध्ये स्व. ब.बु. अलमेलकर यांच्या स्मरणार्थ ही पाणपोई तयार करण्यात आल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी शाळकरी विद्यार्थी, फेरीवाले, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य लोक तहान भागविण्यासाठी येत होते; मात्र आता त्या पाणपोईची दुर्दशा करण्यात आली असून, त्याची कोणतीही देखरेख केली जात नाही. परिणामी हे ठिकाण आता चरसी आणि गर्दुल्ल्याचा अड्डा बनत चालला आहे. स्थानिक आमदार अस्लम शेख तसेच स्थानिक नगरसेविका सलमा अलमेलकर यांनी याकडे लक्ष देत त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. जेणेकरून पूर्वीप्रमाणे पाणपोईचा लाभ नागरिकांना घेता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Panpoi in Malvani became the base of Gardulla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.