Join us

पनवेल ते गोरेगाव लोकल एप्रिल महिन्यापासून धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 6:46 AM

पनवेलहून प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करतात. मात्र, गोरेगावकडे जाण्यासाठी

मुंबई : हार्बर मार्गावरून पनवेलहून अंधेरीपर्यंत असणारा लोकल प्रवास आता, गोरेगावपर्यंत करता येणार आहे. त्यामुळे पनवेल ते गोरेगाव प्रवास सोपा होईल. हा मार्ग एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. लोकल गोरेगावपर्यंत जाणार असल्याने या मार्गाचे सुधारित वेळापत्रक तयार केले जाईल.पनवेल ते गोरेगाव विस्तारीकरण करताना, जोगेश्वरी, गोरेगाव येथे लोकल उभी करण्यासाठी जागेचा अभाव आणि तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, या अडचणींवर उपाय शोधण्यात आले आहेत. याला पश्चिम रेल्वे प्रशासनाची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल ते गोरेगाव लोकल सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

पनवेलहून प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करतात. मात्र, गोरेगावकडे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने पश्चिम रेल्वेचा वापर करतात. आता हार्बरवरून लोकल सेवा गोरेगावपर्यंत सुरू झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल. हार्बर मार्गावर सध्या अंधेरी ते पनवेल दोन्ही दिशेकडे लोकलच्या१८ फेºया होतात. या फेऱ्यांचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्याचा प्रयत्न वेळापत्रकात केला जात आहे.

टॅग्स :लोकलपनवेल