छायाचित्रातून उलगडणार पनवेलचा इतिहास

By Admin | Published: November 23, 2014 10:54 PM2014-11-23T22:54:29+5:302014-11-23T22:54:29+5:30

पनवेल शहर तसे ऐतिहासिक ठिकाण. चाकजोड, औषधनिर्मिती केंद्र, व्यापारी पेठ आणि वाडे हे सारे पनवेलचे वैभव.

Panvel History | छायाचित्रातून उलगडणार पनवेलचा इतिहास

छायाचित्रातून उलगडणार पनवेलचा इतिहास

googlenewsNext

प्रशांत शेडगे, पनवेल
पनवेल शहर तसे ऐतिहासिक ठिकाण. चाकजोड, औषधनिर्मिती केंद्र, व्यापारी पेठ आणि वाडे हे सारे पनवेलचे वैभव. येथील दीडशे वर्षांपूर्वीची नगरपालिका, वस्तूंची खरेदी-विक्री करण्याचे केंद्र. चिमाजी आप्पांनी खोदलेला वडाळे तलाव याशिवाय जुनी मंदिरे, अशोक बाग अशी मोठीच पनवेलची महती आहे. या सर्व इतिहासाचे हवाई छायाचित्रण करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्याकरिता प्रस्तावित प्रशासकीय भवनात आर्ट गॅलरी साकारण्यात येणार असून छायाचित्रणातून पनवेल इतिहास रसिक, जाणकारांसमोर उलगडणार आहे.
सिडकोने पनवेल परिसरात नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, उलवे, तळोजा या वसाहती विकसित केल्या. यामध्ये खारघर नोड सायबर सिटी म्हणून विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार पायाभूत सुविधाही आधुनिक शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने निर्माण केल्या आहेत. त्यामध्ये सेंट्रल पार्क असेल नाहीतर गोल्फसारखा मोठा प्रकल्प यासोबतच उत्सव, शिल्प चौक हे सायबर सिटीची क्रेझ वाढविण्यासाठी बनविल्या आहेत. येथील टोलेजंग इमारती आणि प्रशस्त रस्ते या गोष्टी याची साक्ष देतात. पनवेलमधील जुनी घरे, वाड्यांची जागा आता इमारतींनी घेतलेली आहे. टपऱ्यांच्या जागेवर व्यापारी संकुले उभी राहिली आहेत.
पनवेल महापालिकेचा प्रस्ताव शासन दरबारी असून शहर आणि सिडको नोडची एकत्रित लोकसंख्येचा विचार करता तो आकडा ८ लाखांवर पोहचला आहे. बदलत्या पनवेलच्या स्मृती चिरंतर राहाव्यात याकरिता महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. ब्रिटीशांच्या काळात उभारण्यात आलेल्या तहसील आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या जागेवर भव्य दिव्य प्रशासकीय भवन उभा राहत आहे. मात्र ते करीत असतानाही या वास्तूंचे छायाचित्रण आणि डॉक्युमेंट्री करून ठेवली आहे.

Web Title: Panvel History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.