पनवेल नगरपरिषदेचे कामकाज आता हायटेक

By admin | Published: February 27, 2015 01:17 AM2015-02-27T01:17:05+5:302015-02-27T01:17:05+5:30

लोकाभिमुख प्रशासनाचा भाग म्हणून शासकीय कामकाजात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यादृष्टीने पनवेल नगरपरिषदेने त

Panvel Municipal Council is now working on hi-tech | पनवेल नगरपरिषदेचे कामकाज आता हायटेक

पनवेल नगरपरिषदेचे कामकाज आता हायटेक

Next

पनवेल : लोकाभिमुख प्रशासनाचा भाग म्हणून शासकीय कामकाजात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यादृष्टीने पनवेल नगरपरिषदेने तयार केलेल्या (६६६.स्रंल्ल५ी’ल्लंँ१स्रं१्र२ँं.िूङ्मे) या वेबसाईटचे लोकार्पण गुरुवारी पनवेल नगरपरिषदेच्या सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेबसाईटच्या माध्यमातून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना घरबसल्या आपले कर भरता येणार आहेत, त्यामुळे वारंवार खेटे मारण्याच्या कामातून या नागरिकांची मुक्तता होणार आहे. तसेच नगरपरिषदेत केलेल्या अर्जाची माहिती एसएमएसद्वारे अर्जदाराला मिळणार आहे. पेमेंट गेटवे व एसएमएस गेटवे या महत्त्वाच्या प्रणालीचा यामध्ये सहभाग आहे. या वेबसाईटवर अपलोड केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, जाहिरात धोरण, शहर विकास आराखडा, पाणीपुरवठा जोडणीसंदर्भात माहिती, नगरपरिषदेचा नकाशा, नगरपरिषदेमार्फत निघणाऱ्या निविदा आदींसह विविध प्रकारची माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे. या वेबसाईटचे काम मागील चार वर्षांपासुन सुरू होते. या वेबसाईटच्या पूर्ततेसाठी बँक आॅफ इंडियाकडून ५ लाख ५३ हजार रुपयांचे सहकार्य करण्यात आले आहे.
वेबसाईटच्या लोकार्पण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरपरिषदेची स्थापना १८५२ मध्ये झाल्यानंतर त्यानंतर जी प्रगती होत गेली ती आज २०१५ मध्ये उच्च पातळीवर गेली आहे. मुंबई शहराच्या जवळ असूनही तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी नगरपरिषदेला २०१५ साल उजाडले. हा कालावधी मोठा आहे. या वेबसाईटमुळे नागरिकांना नगरपरिषदेत वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, तसेच या वेबसाईटचा लाभ किती नागरिक घेणार आहेत याची माहिती काढून वेबसाईटबद्दल जनजागृती करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी बँक आॅफ इंडियाला सहकार्यासाठी धन्यवाद दिले. नागरिक वेबसाईटचा फायदा घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आदर्श कुमार अरोरा, मुख्याधिकारी मंगेश चितळे, उपनगराध्यक्ष मदन कोळी, नगरसेवक गणपत म्हात्रे, लतिफ शेख, शिवदास कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Panvel Municipal Council is now working on hi-tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.