पनवेल आरटीओ पाण्यात
By admin | Published: June 25, 2015 02:58 AM2015-06-25T02:58:34+5:302015-06-25T02:58:34+5:30
पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरात काही बँका असल्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.
Next
तळोजा : पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरात काही बँका असल्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. सध्या या परिसरात एक ते दीड फूट पाणी साचले आहे. आरटीओची इमारत खोलगट भागात असल्याने दरवर्षी येथे पाणी साचते. मात्र तरीही सिडकोकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
स्टील मार्केट परिसरात काँक्रिटचे रस्ते असले तरी पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात पाणी साचते. या परिसरात आरटीओने कारवाई केलेल्या शेकडो गाड्या आहेत. या वाहनांमध्येही पाणी गेले आहे. पाणी साचून राहिल्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोकाही बळावला आहे.