रोजच्या वाहतूककोंडीमुळे पनवेलकर हैराण

By admin | Published: September 13, 2014 10:33 PM2014-09-13T22:33:42+5:302014-09-13T22:33:42+5:30

सध्याच्या सणासुदीच्या काळात पनवेल शहरातील अंतर्गत चौक आणि रस्ते सध्या वाहतूककोंडीचे केंद्र बनले आहे.

Panvelkar Haraan due to daily traffic congestion | रोजच्या वाहतूककोंडीमुळे पनवेलकर हैराण

रोजच्या वाहतूककोंडीमुळे पनवेलकर हैराण

Next
पनवेल : सध्याच्या सणासुदीच्या काळात पनवेल शहरातील अंतर्गत चौक आणि रस्ते सध्या वाहतूककोंडीचे केंद्र बनले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर बसणा:या विक्रेत्यांमुळे ही कोंडी पोलिसांना सोडविणो कठीण झाली आहे. यामध्येच वाहतूक विभागाचे पोलीस गायब झाल्याने ही काेंडी सुटण्याऐवजी वाढत आहे.
पनवेलकरांना सध्या घराबाहेर बाजारात स्वत:ची दुचाकी घेऊन खरेदीसाठी निघणो म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे. शहरात सम-विषम पार्किगचे नियम आहेत. व्यापा:यांच्या दुकानासमोर वाहनातील माल काढण्यासाठी अवजड वाहनांच्या पार्किगमुळे टपाल नाका हा परिसर वाहतूककाेंडीने भरलेला दिसतो. येथे व्यापा:यांच्या धाकामुळे वाहनांवर कारवाई करण्याची धमक पोलीस विभागाने गमावल्याने येथे बारमाही वाहतूककोंडीचा विळखा कायम आहे.
अशीच परिस्थिती पंचर} हॉटेलकडून टपाल नाक्याकडे येणा:या मार्गाची आहे. टपाल नाका येथून मोहल्ला येथे ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना अशाच अडचणींना पार करून वाहने चालवावी लागतात. रस्त्यावर बसणा:या विक्रेत्यांवर नगर परिषद प्रशासनाने आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने येथे विक्रेत्यांची चंगळ झाली आहे. मात्र यामुळे सामान्यांची चालण्यासाठीची धडपड पाहायला मिळते.
अगोदर पनवेलची वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलीस विभागाने पनवेल नगर परिषदेने फुटपाथ व रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठीचा तगादा लावला होता. मात्र नगर परिषदेकडून अतिक्रमण हटविण्याबाबत तशा हालचाली होताना दिसत नसल्याने आज पनवेलकरांच्या नशिबी प्रचंड वाहतूककोंडीच आहे. पनवेलमधील वाहतूककोंडीचा जटिल प्रश्न कधी सुटणार, असा त्रस्त जनतेचा सवाल आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Panvelkar Haraan due to daily traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.