Join us  

पावसापुढे पनवेलकर हतबल

By admin | Published: July 30, 2014 12:24 AM

समुद्रसपाटीपासून साडेतीन ते चार मीटर उंचीवर पनवेल शहर वसले आहे. शहरानजीकचा काही परिसर समुद्रसपाटीपासून खाली आहे.

प्रशांत शेडगे - पनवेल
समुद्रसपाटीपासून साडेतीन ते चार मीटर उंचीवर पनवेल शहर वसले आहे. शहरानजीकचा काही परिसर समुद्रसपाटीपासून खाली आहे. यामुळे 1क्क् मिलीमीटरचा पाऊस पडला की अनेक भागात पाणी साचते. बांधकामासाठीच्या भरावामुळेही संकट वाढत असून पाणीबाणीपासून सुटका करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. 
पनवेल परिसरामध्ये तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारी 172.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर मंगळवारी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी अनेक रस्त्यांवर एक फुटापेक्षा जास्त पाणी साचले होते. काही दुकानांमध्ये पाणी शिरले. नजीकच्या कळंबोलीमधील काही घरांमध्येही पाणी शिरले होते. मुसळधार पाऊस पडला की प्रत्येक वर्षी पनवेलचा काही भाग पाण्यात जात आहे. नगरपालिका परिसराचे  क्षेत्रफळ जवळपास 12 चौरस किलोमीटर एवढे आहे. यामध्ये 8.5क् किलोमीटर सिडको विकसित शहर व 3.63 एवढा भाग मूळ पनवेलचा आहे. बहुतांश शहर समुद्रसपाटीपासून साडेतीन ते चार मीटर उंचीवर आहे. काही भागाची उंची खूपच कमी आहे, तर कळंबोलीचा काही भाग समुद्रसपाटीपासून खाली आहे. 
सखल भागामुळे 1क्क् मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आला की शहरात पाणी शिरते. टपाल नाका, बावन बंगला, नवीन पनवेल पोलीस स्टेशन परिसर, उरण नाका व इतर काही भागात प्रत्येक वर्षीच पाणी जात असते. मुसळधार पाऊस व भरती एकाच वेळी असेल तर पाणी साचण्याचा धोका जास्त असतो. नैसर्गिकपणो पाणी जाण्यास अडथळे असताना काही बांधकाम  व्यावसायिक जागा मिळेल त्या ठिकाणी भराव करत आहेत. या भरावामुळे पाणी जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी नगरपालिकेने मोठे नाले बांधण्यास सुरुवात केली आहे. परंतु काही ठिकाणी अद्याप अरुंद नाले असून त्यामुळे पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नसून प्रत्येक वर्षी मुसळधार पावसापुढे शहरवासीयांना हतबल व्हावे लागत आहे. 
 
तहसीलचे नगरपालिकेला पत्र 
सखल भागात शहर वसल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. शहराच्या आजूबाजूला चुकीच्या ठिकाणी व अनधिकृतपणो भराव टाकल्यामुळेही पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तहसील विभागाने गत वर्षभरात जवळपास 6क् जणांना नोटीस दिली आहे. तहसीलदार पवन चांडक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, शहरातील लोकसंख्या वाढत आहे. समुद्रसपाटीनजीक शहर असल्यामुळे मुसळधार पावसात पाणी शहरात येत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असून याविषयी नगरपालिकेस पत्र दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
दीर्घकालीन उपाययोजनांची गरज 
26 जुलै 2क्क्5 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये पनवेल शहर पाण्याखाली गेले होते. यानंतर नगरपालिकेने किलरेस्कर कंपनीकडून शहराचा अभ्यास करून अहवाल तयार करून घेतला आहे. यामध्ये अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. शहरात आवश्यक त्या ठिकाणी होल्डिंग पाँडची गरज आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांचा आकार वाढविण्याची आवश्यकता आहे. या शिवाय इतर उपाययोजनांचाही समावेश आहे. नगरपालिकेने नाल्यांची बांधणी व इतर काही कामे सुरू केली आहेत. परंतु शहराला भविष्यातील संकटापासून वाचविण्यासाठी दीर्घकालीन नियोजन व त्याच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे.