पनवेलकरांची पाणीटंचाईतून सुटका

By admin | Published: June 25, 2014 11:10 PM2014-06-25T23:10:16+5:302014-06-25T23:10:16+5:30

पावसाने दडी मारल्याने संपूर्ण राज्यात त्याचबरोबर रायगड जिल्हय़ात पाणीटंचाईचे संकट उभे आहे.

Panvelkar's release from water shortage | पनवेलकरांची पाणीटंचाईतून सुटका

पनवेलकरांची पाणीटंचाईतून सुटका

Next
>पनवेल : पावसाने दडी मारल्याने संपूर्ण राज्यात त्याचबरोबर रायगड जिल्हय़ात पाणीटंचाईचे संकट उभे आहे. मात्र पनवेलकरांना चिंता करण्याचे काहीच कारण नाही.  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागणी इतका पाणीपुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर एमआयडीसीकडून पालिकेला पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले जाणार नसल्याचे माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिका:यांनी दिली. 
पनवेल पालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता  1क्क् वर्षापूर्वी धरण विकसित केले आहे. एकूण 15 किमी अंतरावर असलेल्या या धरणातून जलवाहिनीव्दारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलाशयात एकूण 3.57 दशलक्ष घनमीटर क्षमता पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. मात्र पावसाळय़ात माथेरानच्या डोंगराहून पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ धरणात बसल्यामुळे खोली कमी होत आहे. परिणामी, पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही कमी होत चालली आहे. जुलै ते मार्च  देहरंग धरणातून एकूण 12  एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर उर्वरित पाणी एमजेपी आणि एमआयडीसीकडून घेण्यात येते. दरवर्षीप्रमाणो यंदा एप्रिल महिन्यार्पयत देहरंग धरणातून पाणी उपलब्ध झाले मात्र आता पाणी साठा संपल्याने गेल्या  काही दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून  18 एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्याचबरोबर उर्वरित 8 एमएलडी गरज एमआयडीसी भागवत आहे. 
पनवेल शहराला सुमारे 27 एमएलडी पाण्याची गरज असून ती गरज या दोनही प्राधिकरणाकडून भागवली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडी त्याचबरोबर पालिका प्रशासनाचा समन्वय साधल्यामुळे शहराला पुरेशा पाणीपुरवठा होत आहे. जून महिना पूर्णत: कोरडा गेल्याने  सर्वत्र पाणी टंचाईला प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसाधारणपणो जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जुलै महिन्यात देहरंग धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु जून महिना संपत आला तरी पावसाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे पालिकेच्या मालकीचा जलसाठा कोरडाच आहे. याचा विचार करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमजेपी आणि एमआयडीच्या  अधिका:यांशी चर्चा करून  शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. (प्रतिनिधी)
 
एमजेपीकडे पाताळगंगा 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाताळगंगा नदीतून पाणी उचलते  व त्यावर भोकर पाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करते. शुध्द झालेले पाणी पनवेल पालिका  सिडको आणि जेएनपीटीला पुरवले जाते. दरम्यान खोपोली येथील जलविद्युत निर्माण केंद्रातील पाणी पाताळगंगा नदीत सोडले जाते. त्याचबरोबर घाटात पाऊस चांगला पडत असल्याने डोंगरावरील पाणी या नदीत येते. परिणामी या पात्रत सतत पाणी असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाणी कमी पडत नाही. त्यामुळे पनवेलकरांना चिंतेचे कारण नसल्याचे अधिका:यांनी सांगितले.

Web Title: Panvelkar's release from water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.