Join us

अखेर पराग अळवणी यांनी मारली बाजी, भापकडून सलग तिसऱ्यांदा मिळाली उमेदवारी

By मनोहर कुंभेजकर | Published: October 20, 2024 7:10 PM

 डॉ.दीपक सावंत अपक्ष लढणार?

मुंबई - आज भाजपाची विधानसभेची पहिली यादी जाहिर झाली.विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून २०१४ पासून सलग दोन वेळा आमदारकी भूषवणारे भाजप आमदार अँड.पराग अळवणी यांच्या वर विश्वास ठेवत पक्षाने त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा येथून उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी निवडणूकीची तयारी आधीपासूनच सुरू केली असून, उद्यापासूनच त्यांचा मतदार संघात प्रचाराला सुरवात होण्याची शक्यता आहे. त्यांचा विभागवार कार्यअहवाल देखिल पार्लेकरांच्या घरोघरी पोहचला आहे. 

पार्लेकर आणि अळवणी असे गेली अनेक वर्षे समीकरण असून पार्ले महोत्सवाच्या माध्यमातून ते घरोघरी पोहचले.त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून काँग्रेस लढणार का उद्धव सेना लढणार हे अजून काही ठरलेले नाही.

विलेपार्ले विधानसभा मतदार संघात अँड.पराग अळवणी व भाजप मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्यात तिकीटासाठी शेवट पर्यंत रस्सीखेच सुरू होती.उपाध्याय यांनी तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी येथे जनसंपर्क कार्यालय उघडले होते,गणपती आणि नवरात्रीत त्यांनी पार्ल्यात बॅनरबाजी केली होती आणि जोमाने जनसंपर्क सुरू केला होता.त्यामुळे अळवणी का उपाध्याय यापैकी कोणाला तिकीट मिळणार याकडे पार्लेकर व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.अखेर अळवणी यांनी बाजी मारली.

 डॉ.दीपक सावंत अपक्ष लढणार?

विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची जागा शिंदे सेनेला मिळावी अशी मागणी राज्याचे माजी आरोग्य मंत्री व शिंदे सेनेचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा  तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती.

गेल्या शुक्रवारी त्यांनी मुंबईत जे.पी.नड्डा यांची भेट घेतली . यावेळी सुमारे १५ मिनीटे राजकीय आणि आरोग्य विषयक चर्चा या दोघांमध्ये झाली.जर तिकीट मिळाले नाही तर डॉ.दीपक सावंत येथून अपक्ष लढण्याची मला परवानगी द्या असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित आहे.

टॅग्स :भाजपापराग अळवणी