राज्यातील अडीच हजारांहून अधिक नवजात बालकांना पक्षाघात; मुंबईत १,२०९ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 06:28 AM2020-02-16T06:28:50+5:302020-02-16T06:28:54+5:30

संडे अँकर । आरोग्य विभागाची माहिती; हृदयरोग, कर्करोगानंतर जगातील मृत्यूचे तिसरे कारण

Paralysis of more than two and a half thousand infants in the state; 1,959 patients in Mumbai | राज्यातील अडीच हजारांहून अधिक नवजात बालकांना पक्षाघात; मुंबईत १,२०९ रुग्ण

राज्यातील अडीच हजारांहून अधिक नवजात बालकांना पक्षाघात; मुंबईत १,२०९ रुग्ण

Next

स्नेहा मोरे 

मुंबई : मेंदूला आॅक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अचानक अडथळा निर्माण झाल्याने पक्षाघात येतो. या आजारावर वेळेवर उपचार झाले नाहीत, तर मेंदूतील पेशींचे कायमस्वरूपी नुकसान होऊन, मेंदूवर परिणाम केलेल्या घटकांशी संबंधित अपंगत्व किंवा मृत्यू होऊ शकतो. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांत शून्य ते पाच वयोगटांतील अडीच हजारांहून अधिक नवजात बालकांना ‘पक्षाघात’ झाल्याचे निदान झाले आहे.

राज्यात दोन वर्षांत २ हजार ५७९ नवजात बालकांना पक्षाघाताचे निदान झाले. त्यात मुंबई शहर उपनगरात १ हजार २०९ बालकांचा समावेश आहे. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्येत स्थलांतरित रुग्णांचाही समावेश आहे. मुंबईखालोखाल पुणे शहरात ३५६, ठाण्यात १३२ इतकी रुग्णसंख्या आहे. याशिवाय, औरंगाबादमध्ये दोन्ही वर्षांत एकाही रुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही. या रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये म्हणजेच २-३ तासांच्या आत उपचार मिळाले, तर तो बरा होण्याची खूप जास्त शक्यता असते.
याविषयी, मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शैशवी कोरगावकर यांनी सांगितले की, पक्षाघात म्हणजे अर्धांगवायू होय. वय झाल्यानंतरच अर्धांगवायूचा झटका येतो, असे नाही. जगात दर सहापैकी एका व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी हा आजार होतो. हृदयरोग आणि कर्करोगानंतर पक्षाघात हे जगातील मृत्यूचे तिसरे कारण आहे, तर अपंगत्व येण्यासाठी हा आजार पहिले कारण ठरतो. पक्षाघात आल्यावर मेंदूचा जो भाग खराब होतो, त्यात शरीराचा एखादा भाग कमी क्रियाशील होतो. पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यासाठी चेहरा, हात, बाळाची हालचाल पाहून तत्काळ डॉक्टरांच्या लक्षात आणून द्यावे.

‘गोल्डन अवर’मध्ये काळजी घेणे गरजेचे
जन्माच्या वेळी बालकांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा भाग असतो, त्यांचा श्वासोच्छवास सुरू करणे आणि आवश्यकता भासल्यास योग्य पद्धतीने श्वसनाला साहाय्य करणे. बºयाचदा या बालकांना जन्मानंतर कृत्रिम श्वासोच्छवास देऊन त्यांची श्वसनक्रिया सुरू करावी लागते. कृत्रिम श्वासोच्छवासाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात आणि ३७ आठवड्यांनंतर जन्मलेल्या बाळांसाठी वापरल्या जाणाºया पद्धतींच्या तुलनेत काहीशा नाजूक असतात. म्हणजेच, गोल्डन अवरमध्ये बालकांना कृत्रिम श्वासोच्छवास देणे आणि त्यानंतरची काळजी यांचा समावेश असतो. या बाळांना नीओनॅटल इंटेसिव्ह केअरमध्ये नेणे हेसुद्धा आव्हान असते. कारण ही बाळं फारच नाजूक असतात आणि या टप्प्यात त्यांच्यामध्ये काही गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. गोल्डन अवरच्या काळात योग्य काळची घेतली जायला हवी. संसर्गाला दूर ठेवणारी काळजी घेतल्यास जंतुसंसर्ग टाळता येतो, तसेच सुरुवातीच्या काळातील काळजी, वजन नोंदविणे आणि स्तनपान याचीही काळजी घेतली जायला हवी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Web Title: Paralysis of more than two and a half thousand infants in the state; 1,959 patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.