Param Bir Singh: परमबीर सिंगांनी स्वीकारली नवी जबाबदारी; 100 कोटींच्या लेटर बॉम्बचे दिल्लीपर्यंत पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 01:29 PM2021-03-22T13:29:36+5:302021-03-22T13:30:22+5:30
Parambir Singh came at Home guard office: राज्याचा राजकारणात शनिवारी रात्री भूकंप आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते.
सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी (Param Bir Singh) नवी जबाबदारी स्वीकारली आहे. परमबीर यांची बदली होम गार्डच्या प्रमुखपदी करण्यात आली होती. (Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh reaches the Home Guard department office.)
आज परमबीर सिंगांनी होमगार्डच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. सचिन वाझे प्रकरणी गेल्या आठवड्यात परमबीर सिंगांची बदली करण्यात आली होती. त्यांच्याबरोबरच इतर अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे (Sachi Vaze) प्रकरणात उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर लोकमतच्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंगांची बदली अक्ष्यम्य चुकांमुळे करण्यात आल्याचे सांगत ही बदली नसून कारवाई असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून दुखावल्या गेलेल्या परमबीर सिंगांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री कार्यालयावर लेटर बॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती.
Maharashtra: Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh reaches the Home Guard department office. He has been transferred and posted as the DG of the department. pic.twitter.com/tyQATzkXBZ
— ANI (@ANI) March 22, 2021
परमबीर सिंगांनी केलेले धाडस हे खुप मोठे आहे. यामुळे त्यांना सरकारच्या रोषाचाही सामना करावा लागू शकतो. यामुळे परमबीर सिंगांनी पाठविलेला लेटर बॉम्ब हा त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परमबीर यांची विभागीय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून एकतर पोलीस आयुक्त किंवा गृहमंत्र्यांची विकेट जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतू पोलीस आयुक्तांची विकेट पडली होती. शरद पवार देशमुखांवर नाराज असल्याचीही चर्चा होती.
दोन दिवसांत काय घडले...
राज्याचा राजकारणात शनिवारी रात्री भूकंप आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केला होता.
यानंतर भाजपाने हे प्रकरण उचलून धरत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत चौकशीची मागणी केली होती. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीदेखील एका पोलीस एपीआयला एवढे तर राज्यात असे किती आयुक्त आहेत, त्यांना किती सांगितलेले हा आकडादेखील बाहेर यायला हवा अशी मागणी केली होती. या साऱ्य़ावर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत परमबीर सिंगांचे आरोप गंभीर आहेत, परंतू पुरावे दिलेले नाहीत. यामुळे या प्रकरणाची ज्युलिओ रिबेरोंसारख्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला होता.