Join us

Param Bir Singh Letter: आधी पत्र येतं, मग लगेच फडणवीस येतात; काँग्रेसनं सांगितली 'लेटर बॉम्ब'मागची स्क्रिप्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 1:44 PM

Param Bir Singh Letter: गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना मोदी शहांवरदेखील आरोप झाले, त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का?; सावंत यांचा सवाल

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं वातावरण भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक निर्माण केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांत कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र निर्माण करायचं. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा. येनकेनप्रकारेण सत्ता उलथवायची. साम दाम दंड भेद अशा सगळ्या मार्गांचा वापर करून सरकारं पाडायची, असे उद्योग भाजपनं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्याच वर्षात केले, असं सावंत म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Param Bir Singh Letter and bjps response was scripted alleges congress leader sachin sawant )परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब; राज ठाकरेंनी उपस्थित केले १० महत्त्वाचे मुद्देपोलीस दलातील अधिकाऱ्यानं पत्र लिहून खदखद व्यक्त केल्याची घटना देशात पहिल्यांदा घडलेली नाही. २००२ मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शहा पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का? वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का?, असे प्रश्न सावंत यांनी विचारले.100 कोटी वसुलीप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का? केंद्राकडून पहिल्यांदाच मोठे वक्तव्य़विरोधी पक्षाच्या सरकारला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचण्यात भाजपचा हातखंडा आहे. याआधी अनेकदा भाजपनं अशी कारस्थानं रचली आहेत, असा दावा सावंत यांनी केला. भाजपचं षडयंत्र स्क्रिप्टेड असतं. पोलीस आयुक्त पदावरून दूर झालेले परमबीर सिंग पत्र लिहिणार याची भाजप नेत्यांना कल्पना होती. त्यांना सगळं आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळेच तर पत्र बाहेर येताच फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, असं सावंत यांनी म्हटलं.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल सावंत यांनी शंका उपस्थित केल्या. वाझे फेब्रुवारीत देशमुखांना भेटल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. पण देशमुख यांना फेब्रुवारीत कोरोनाची लागण झाली होती. मग ही भेट कशी काय झाली? परमबीर सिंग यांचा निकटचा सहकारी असलेला सचिन वाझे सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. त्यामुळे सिंग यांचीदेखील चौकशी होऊ शकते. त्याची भीती असल्यानं त्यांनी आता आरोप केले आहेत का? याआधी ते गप्प का होते? चौकशी होणार असल्याचं लक्षात येताच आपल्या सहकाऱ्यांसोबत चॅट करून ते पुरावे गोळा करत होते का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

टॅग्स :परम बीर सिंगसचिन वाझेनरेंद्र मोदीअमित शहासचिन सावंतकाँग्रेसअनिल देशमुख