Join us

उचलबांगडी झालेले परमबीर सिंगही रजेवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 3:21 AM

गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत  हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फाेटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदाराेळामुळे  परमबीर सिंग अडचणीत आले आहेत.

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक  त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते. (Parambir Singh also on leave!)गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत  हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फाेटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदाराेळामुळे  परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. आयुक्तपदावरुन त्यांची  उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणी त्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली केल्याचे सूत्रांनी सांगितले.

रजनीश सेठ यांनी घेतली डीजीपीची सूत्रेपोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेले एसीबीचे प्रमुख रजनीश सेठ यांनी गुरुवारी सकाळी पदाची सूत्रे घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यालयातील सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली, तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेतला. 

टॅग्स :परम बीर सिंगसचिन वाझेराज्य सरकारअनिल देशमुख