Join us

‘फरारी’ आदेश रद्द करण्यासाठी परमबीर सिंह न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 11:00 AM

गेल्याच आठवड्यात दंडाधिकाऱ्यांनी सिंह यांना ‘फरारी’ घोषित केले. तसेच बिल्डर व हॉटेलियर बिमल अगरवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली.

मुंबई : न्यायालयाने ‘फरारी’ घोषित केलेले आदेश रद्द करावेत, तसेच आपल्याविरोधात जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करावे, यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एस्प्लानेड न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.गेल्याच आठवड्यात दंडाधिकाऱ्यांनी सिंह यांना ‘फरारी’ घोषित केले. तसेच बिल्डर व हॉटेलियर बिमल अगरवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी न्यायालयाने सिंह यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या एफआयआरमध्ये परमबीर सिंह यांच्यासह निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य चार जणांचा समावेश आहे.अगरवाल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दोन बार आणि रेस्टॉरंटवर धाड न घालण्यासाठी सिंह यांनी नऊ लाखांची लाच मागितली. तसेच २.९२ लाख किमतीचे दोन फोन मागितले. ही घटना जानेवारी २०२० आणि मार्च २०२१ दरम्यानची आहे. गुरुवारी सिंह यांची सहा तास चौकशी केली. त्यानंतर सिंह यांच्या वतीने गुंजन मंगला यांनी अजामीनपात्र वॉरंट रद्द करावे व त्यांना ‘फरारी’ घोषित करण्याचे आदेशही रद्द करावेत, असा अर्ज केला.  

टॅग्स :परम बीर सिंगपोलिसन्यायालय