परमबीर सिंग यांनी सिक लिव्ह वाढवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:01+5:302021-07-15T04:06:01+5:30

विभागीय चौकशी रेंगाळली : पाठीच्या आजाराचे निमित्त जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्येष्ठ आयपीएस ...

Parambir Singh extended sick leave | परमबीर सिंग यांनी सिक लिव्ह वाढवली

परमबीर सिंग यांनी सिक लिव्ह वाढवली

googlenewsNext

विभागीय चौकशी रेंगाळली : पाठीच्या आजाराचे निमित्त

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी आजारी रजा (सिक लिव्ह) वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध करत असलेली चौकशी रखडली आहे. पाठीचा आजार बळावल्याचे कारण देत त्यांनी ही रजा वाढवल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

परमबीर सिंग हे गेल्या ३० एप्रिलपासून रजेवर आहेत. त्यापैकी सुरुवातीचे काही दिवस वगळता ते ‘सिक लिव्ह’वर आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील गंभीर आरोपांबाबतची चौकशी प्रलंबित राहिली आहे.

मुंबईच्या आयुक्त पदावरून होमगार्डला उचलबांगडी केल्यानंतर परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दर महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गौप्यस्फोट केला. याप्रकरणी सध्या सीबीआय, ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे, तर देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

परमबीर यांच्याविरुद्धही भ्रष्टाचार, खंडणीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी काहींबद्दल गुन्हे दाखल तर काहींची सीआयडी व अन्य यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे.

परमबीर यांनी केलेल्या सेवा नियमांचे उल्लंघन आणि मलबार हिल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनुप डांगे यांना जाणीवपूर्वक दिलेला त्रास आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत प्राथमिक चौकशी नियोजन विभागाचे अप्पर सचिव देबशिष चक्रवर्ती यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांना याप्रकरणी तत्काळ अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार परमबीर सिंग हे अद्याप एकदाही चौकशीला हजर झालेले नाहीत, त्यांचा जबाबही पाठविण्यात आलेला नाही, त्यासाठी आजारी असल्याचे कारण त्यांनी दिले आहे.

.................

संजय पांडेंचा केला होता कॉल रेकॉर्ड।

परमबीर यांची प्राथमिक चौकशी सुरुवातीला अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे दिली होती. त्यांनी ती सुरू करण्यापूर्वी परमबीर सिंग यांनी ‘कॉल ऑन’साठी भेट घेतली, त्यानंतर व्हाॅट्सॲप कॉल करून त्यांचे पत्र मागे घेण्याबद्दल वदवून घेतले, ते संभाषण रेकॉर्ड करून न्यायालयात सादर केले. त्यामुळे पांडे यांना स्वतःहून चौकशीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरला नाही.

Web Title: Parambir Singh extended sick leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.