Join us

Supriya Sule: महाविकास आघाडी 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!, सुप्रिया सुळेंची सोनियांसोबत चर्चा, राज्यातही जोरदार 'प्लॅनिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:46 AM

Parambir Singh Letter Bomb: Mahavikas Agahdi leaders in action mode NCP MP Supriya Sule talks with Sonia Gandhi राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांच्या नेत्यांची खलबतं सुरू असतानाच दिल्लीतही हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रावरुन विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झाडण्यात येत असताना आता महाविकास आघाडी सरकारचेही नेते 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांच्या नेत्यांची खलबतं सुरू असतानाच दिल्लीतही हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. (Mahavikas Agahdi Leaders In Action Mode NCP MP Supriya Sule Talks With Sonia Gandhi)

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. "तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप आभारी आहे", असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. सुप्रिया सुळे यांची सोनियांसोबतची चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे जरी स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधींमध्ये संवाद झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

दुसरीकडे राज्यातही महाविकास आघाडीचे नेतेही विरोधकांच्या आरोपांमधली हवा काढण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महत्वाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. 

आपण लढलं पाहिजे- मुख्यमंत्रीमहाविकास आघाडीच्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. "आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, पण आता भाजपचा हल्ला परतून लावण्यासाठी आपण एकत्र लढलं पाहिजे", असं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलं. 

टॅग्स :सुप्रिया सुळेपरम बीर सिंगउद्धव ठाकरेसोनिया गांधीशरद पवारअनिल देशमुखसचिन वाझे