मुंबई: सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना (Sachin Vaze) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबद्दल पत्र लिहिलं आहे. टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.
स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करताहेत; गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 7:14 PM