मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या यायिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, याबाबत कोणताही निर्णय न देता परमबीर सिंह यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याप्रमाणे आज परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्ट वर्तणुकीची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी'अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
परमबीर सिंग यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायायलात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातील सर्व आरोपांचा उल्लेख त्यांनी याचिकेत केला होता. काल सर्वोच्च न्यायालयाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केलं नाही? अशी विचारणा केली होती. तसेच यावेळी त्यांनी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही? अशी विचारणा केली. परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.तसेच दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आली. सिंग यांच्यावतीने अॅड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली हा दुर्मीळ प्रकार असल्याचं रोहतगी म्हणाले. त्यावर कोर्टाने हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने रोहतगी यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.