Join us

एनआयएच्या तपासावरच ठरणार परमबीर सिंग यांचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:06 AM

आयुक्तांना तूर्तास अभय; महाविकास आघाडीचे एकमतजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्फोटक कारचा बनाव व व्यापारी मनसुख ...

आयुक्तांना तूर्तास अभय; महाविकास आघाडीचे एकमत

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्फोटक कारचा बनाव व व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे खात्यावर करण्यात आलेल्या आराेपांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली निश्चित मानली जात असली तरी त्याबाबत घाई न करण्याचा पवित्रा राज्य सरकारने घेतला आहे. एनआयएच्या तपासातून त्यामागील व्याप्ती स्पष्ट होईपर्यंत त्यांना अभय देण्याचा निर्णय घेण्यात आला.

येत्या दोन - तीन दिवसांत एनआयएकडून या गुन्ह्याबाबत तपासाअंती मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई पोलीस दलात फेरबदल करण्यात येतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेचे पडसाद पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. या प्रकरणांमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने काम करण्यासाठी आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करावी, या मतापर्यंत महाविकास आघाडीचे नेते पोहोचले आहेत. त्यासाठी अन्य अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र तपास आणि त्यातून समाेर येणारे वास्तव स्पष्ट होईपर्यंत कोणताही बदल न करण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे.

----------