Join us

एनआयए तपासावरच ठरणार परमबीर सिंग यांचे भवितव्य, तूर्तास अभय; महाविकास आघाडीचे एकमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 2:34 AM

येत्या दोन - तीन दिवसांत एनआयएकडून   या गुन्ह्याबाबत तपासाअंती मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई पोलीस दलात फेरबदल करण्यात येतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

जमीर काझी - 

मुंबई : स्फोटक कारचा बनाव व व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे खात्यावर करण्यात आलेल्या आराेपांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली  निश्चित मानली जात असली तरी त्याबाबत घाई न करण्याचा पवित्रा राज्य सरकारने घेतला आहे. एनआयएच्या तपासातून त्यामागील व्याप्ती स्पष्ट होईपर्यंत त्यांना अभय देण्याचा निर्णय  घेण्यात आला. (Parambir Singh's future will depend on NIA probe)

येत्या दोन - तीन दिवसांत एनआयएकडून   या गुन्ह्याबाबत तपासाअंती मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई पोलीस दलात फेरबदल करण्यात येतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेचे पडसाद पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. या प्रकरणांमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने काम करण्यासाठी आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करावी, या मतापर्यंत महाविकास आघाडीचे  नेते पोहोचले आहेत. त्यासाठी अन्य अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र तपास आणि त्यातून समाेर येणारे वास्तव स्पष्ट होईपर्यंत कोणताही बदल न करण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे.

चर्चा, भेटींचा दिवसलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पाेलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. तर रात्री उशिरा पाेलीस आयुक्त परमबीर सिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीस वर्षा बंगल्यावर दाखल झाले हाेते.  

टॅग्स :परम बीर सिंगराष्ट्रीय तपास यंत्रणासचिन वाझेगुन्हेगारीमनसुख हिरणमुकेश अंबानी