‘परमवीर’च्या लेखिका मंजू लोढा यांचा सन्मान
By admin | Published: December 24, 2016 03:40 AM2016-12-24T03:40:37+5:302016-12-24T03:40:37+5:30
देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांवर आणि वीर जवानांच्या शौर्यावर ‘परमवीर’ पुस्तक लिहिणाऱ्या
मुंबई : देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांवर आणि वीर जवानांच्या शौर्यावर ‘परमवीर’ पुस्तक लिहिणाऱ्या प्रसिद्ध लेखिका मंजू लोढा यांचा प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ इंदु साहनी यांनी सन्मान केला.
बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात लोढा यांनी म्हटले की,‘परमवीर’ पुस्तक लिहून त्यांनी देशाप्रती असलेल्या कर्तव्याचे पालन केले आहे. या वेळी लोढा यांचा शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. देशाच्या सेवेमध्ये त्यांचे ‘परमवीर’ हे अद्भुत योगदान असल्याचे सांगितले. त्यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या नातेवाईकांनी आणि सर्व लोकांनी देशाच्या सेवेमध्ये शक्य ते योगदान द्यावे, असे आवाहन केले. यावेळी शारदा मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, राष्ट्रीय गीते संगीत व नृत्यासह प्रस्तुत केली. आमदार मंगल प्रभात लोढ़ा यांच्यासह शारदा मंदिर शाळेतील सर्व विश्वस्त आणि अन्य प्रतिष्ठित लोकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुस्तकामध्ये आजवर परमवीर सन्मान मिळालेल्या २१ वीर सैनिकांच्या शौर्यगाथा त्यांनी प्रस्तुत केल्या आहेत. मंजू लोढ़ा यांनी बांग्लादेशातील विजय, सियाचेनच्या अतिशय थंड हवेतील सैनिकांचे शौर्य आणि अन्य काही महत्त्वपूर्ण नोंदी या पुस्तकात संकलित केल्या आहेत. (प्रतिनिधी)