Join us

परांजपे बंधू भूखंड घोटाळा : १६ जुलैपर्यंत अटक करता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 12:38 PM

विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर आणि जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात वसुंधरा डोंगरे (७०) यांनी केला आहे.

ठळक मुद्देविलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर आणि जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात वसुंधरा डोंगरे (७०) यांनी केला आहे

मुंबई - पुण्यातील नामांकित विकासक परांजपे बंधु यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर दिंडोशी कोर्टात सुनावणी आज सुनावणी होणार होती. मात्र फिर्यादीच्या वकिलाना कोर्टात काही कागदपत्रे सादर करायची असल्याने त्यांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितली. त्यानुसार या अर्जावर आता १६ जुलै रोजी सुनावणी होणार असुन तो पर्यंत कोर्टाने आरोपींना अटकेपासून दिलासा दिल्याचे त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 

विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर आणि जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात वसुंधरा डोंगरे (७०) यांनी केला आहे. त्यानुसार विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांना पुण्यातील राहत्या घरातुन ताब्यात घेत चौकशीसाठी ठाण्यात आणले. याप्रकरणी अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांचे वकील ऍड सुबोध देसाई आणि ऍड निरंजन मुंदरगी यांनी २ जुलै, २०२१ रोजी कोर्टात जामीनअर्ज दाखल केला होता. फिर्यादी डोंगरे यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने वेळ वाढवुन मागितली. त्यानुसार आता १६ जुलै रोजी यावर सुनावणी होणार असुन तो पर्यंत पोलिसांना परांजपे याना अटक करता येणार नाही. 

टॅग्स :मुंबईपुणेगुन्हेगारीन्यायालय