प्रसिद्ध महाविद्यालयांचा कटआॅफ चढाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:08 AM2017-07-29T05:08:04+5:302017-07-29T05:08:11+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळावरून शिक्षण उपसंचालक विभागाने धडा घेऊन तिसरी यादीही एक दिवस अगोदर जाहीर करून विद्यार्थ्यांना धक्का दिला
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळावरून शिक्षण उपसंचालक विभागाने धडा घेऊन तिसरी यादीही एक दिवस अगोदर जाहीर करून विद्यार्थ्यांना धक्का दिला. वेळापत्रकानुसार, शनिवार, २९ जुलैला जाहीर होणारी अकरावीची तिसरी यादी शुक्रवार, २८ जुलैला सायंकाळी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. यंदा तिसºया यादीतही नामांकित महाविद्यालयांचा कटआॅफ चढाच असल्याचे चित्र आहे. तिसºया यादीत ४७ हजार ९५६ विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळाला आहे.
अकरावीची प्रक्रिया यंदापासून संपूर्णपणे आॅनलाइन करण्यात आली होती. अर्ज भरण्यापासून पहिली यादी जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना खूप त्रास झाला. पहिल्या यादीवेळी डेटा अपलोड झाला नसल्यामुळे मध्यरात्री यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातही अनेक विद्यार्थ्यांना दुसºया दिवशीपर्यंत मेसेज न गेल्याने वेळापत्रकात अर्धा दिवस प्रवेशासाठी वाढीव देण्यात आला होता. त्यानंतर दुसरी यादी विभागाने एक दिवस आधीच जाहीर केली होती. तिसरी यादीही एक दिवस आधी जाहीर करून विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला.
तिसºया यादीसाठी कला शाखेसाठी १४ हजार ४२, वाणिज्य शाखेत ५६ हजार २३४, विज्ञान शाखेच्या ३१ हजार ९२७ आणि एमसीव्हीसी शाखेतून २,९८३ अशा एकूण १ लाख ५ हजार १८६ जागा शिल्लक होत्या. त्यापैकी एकूण ४७ हजार ९५६ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर केले आहेत. यात एकूण ९ हजार ५५४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय जाहीर झाले आहे.
पहिल्या यादीपासून असलेल्या कटआॅफमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत झाल्याचे दिसून येत नाही. तिसºया यादीनंतरही अनेक नामांकित महाविद्यालयांचा कटआॅफ चढाच आहे. रुईया महाविद्यालयात कला शाखेसाठी दुसºया यादीत कटआॅफ ९३.२ टक्के इतका होता. यंदा तो ९३.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मिठीबाई महाविद्यालयाचा कला शाखेचा कटआॅफ यंदा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या यादीत तो ८४. ६ टक्क्यांवर होता.