लाखोंचे सोने असलेले पार्सल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:35 AM2019-02-22T03:35:52+5:302019-02-22T03:36:13+5:30
नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक : गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
मुंबई : मौल्यवान दागिन्यांची ने-आण करणाºया एका नामांकित कंपनीच्या कर्मचाºयाला गुरुवारी गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष आठने बेड्या ठोकल्या. चोरीला गेलेला सगळा ऐवज परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे़ याप्रकरणी एअरपोर्ट पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
सुरेश बरका हुमाणे (३८) असे अटक कर्मचाºयाचे नाव आहे. तो मालाड पुर्वच्या शिवसागर चाळीत राहतो. संबंधित कंपनी ही मुंबई तसेच परदेशातुन विमानतळावर येणाºया सोने,चांदी तसेच मौल्यवान हिºयांचे पार्सल इच्छित ठिकाणी पोहोचविण्याचे काम करते. त्याची एक शाखा मुंबई विमानतळ परिसरातही आहे़ हुमाणे पार्सल डिलीव्हरी बॉयना सोपविण्याचे काम करतो. ५ फेब्रुवारी, २०१९ रोजी दिल्लीतील एका कंपनीने एकूण २७ पार्सल या कंपनीकडे पाठवले होते. त्यात सोन्याचे दागिने असलेल्या एका पार्सलचाही समावेश होता. हे पार्सल झवेरी बाजारमधील एका ग्राहकाला पोहोचविण्याची जबाबदारी या कंपनीने घेतली होती. ते पार्सल ग्राहकाला मिळालेच नाही. ग्राहकाने कंपनीला संर्पक करत याबाबत तक्रार केली. कंपनीने केलेल्या चौकशीदरम्यान दिल्लीतील कंपनीतून २७ पार्सल पाठविण्यात आले. त्यात २६ पार्सल योग्य ठिकाणी पोहोचले. १५ लाख ७९ हजार ७०२ रुपये किंमतीचे झवेरी बाजारचे पार्सल त्यातून गायब असल्याच लक्षात आले. त्यानुसार या कंपनीने एअरपोर्ट पोलीस ठाण्यात धाव घेत याविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्याने एअरपोर्ट पोलिसांसह याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेचे कक्ष ८ देखील करत होते.
...आणि त्याने कबुली दिली
च्कक्ष ८ चे प्रमुख अरुण पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तोगरवाड, पोलीस उपनिरीक्षक मोहिते, देवकर, वडारे, चिंचोलकर, विचारे आणि पथकाने तपास सुरू करत या कंपनीचे तसेच विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पार्सल हाताळणाºया सर्व कर्मचाºयांची कसून चौकशी केली गेली. त्यावेळी हुमाणे याचे वागणे त्यांना संशयास्पद वाटल्याने त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने गुन्हा कबुल केला. चोरीला गेलेली शंभर टक्के मालमत्ताही पोखरकर यांच्या पथकाने परत मिळवत हुमाणे याला पुढील कारवाईसाठी एअरपोर्ट पोलिसांच्या ताब्यात दिले.