सलाम मुंबईकर! दोन तासात जमा झालं पुरेसं रक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 01:24 PM2017-09-29T13:24:26+5:302017-09-29T17:52:58+5:30
मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या जखमींवर उपचारासाठी नागरिकांनी रक्त देण्याचं आवाहन केईएम हॉस्पिटलकडून करण्यात आलं होतं. पण आता हॉस्पिटलमध्ये असलेल्या जखमींच्या उपचारासाठी पुरेल इतकं रक्त मिळालं आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भातील माहिती ट्विट करून दिली आहे. तसंच मुंबईकरांचे आभारही मानले आहेत. मुंबईकरांनी रक्त देण्याच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानण्यात आले आहेत.
ThankU Mumbai for the response to request for blood. KEM hospital has rcvd enough to treat the injured. Grateful for responding to the call.
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 29, 2017
मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 39 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे. जखमींसाठी रक्ताची कमी जाणवत असून ए-नीगेटीव्ह (A-), बी- निगेटीव्ह (B-), एबी निगेटीव्ह (AB-) रक्तगट असणाऱ्यांनी केईएम रुग्णालयाशी लवकरात लवकर संपर्क करण्याचं आवाहन केलं होतं.
मुंबई पोलिसांनी जारी केले हेल्पलाईन क्रमांक
केईएम हॉस्पिटल : 022-24107000
वेस्टर्न रेल्वे कंट्रोल रूम : 022-23070564, 022-23017379, 022-23635959
मुंबई रेल्वे कंट्रोल रूम : 022-23081725
ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सअॅप नंबर : 8454999999
नेमके काय घडले?
सकाळपासूनच मुंबई शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावरील पत्र्याचा काही भाग खाली कोसळल्याचे वृत्त समोर आले. मात्र पूल सुरक्षित होता. पण या घटनेदरम्यान प्रवाशांमध्ये पूल पडल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमका याचसुमारास जोरदार पाऊस पडला आणि अनेक प्रवासी बाहेर न जाता खोळंबले होते. त्यात नवीन येणारी प्रत्येक गाडी हजारो प्रवासी या दोन्ही स्टेशनांवर येत होते. त्यामुळे थोड्याच वेळात या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. त्यात झालेल्या लहान घटनेमध्ये पूल पडल्याच्या अफवेची भर पडली. काहीजणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची बोंब ठोकली. या सगळ्याचा विपरीत परिणाम होत प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता वाढली.
अफवांवर विश्वास ठेवू नका
अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
कोट्यवधी खर्च करुन उभारला होता पूल
रेल्वे प्रशासनाने परळ येथे कोट्यवधी खर्च करून पादचारी पूल उभारला आहे. हा पूल दादरच्या दिशेला जाणारा आहे. या पुलाचा वापर होणार नाही, त्यामुळे हा पैशांचा अपव्यय ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांसह नागरिकांनी दिली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या प्रतिक्रियांना केराची टोपली दाखवून पूल उभारला. यामुळे मुंबई दिशेकडील पुलावरील प्रत्यक्ष गर्दी जैसे थेच राहिली होती. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला आता तरी जाग येईल का? , असा सवाल संतप्त स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.
दुर्घटनेतील मृतांची नावे
मसूद आलम
शुभलता शेट्टी
सुजाता शेट्टी
श्रद्धा वरपे
मीना वरुणकर
तेरेसा फर्नांडिस
मुकेश मिश्रा
सचिन कदम
मयुरेश हळदणकर
अंकुश जैस्वाल
सुरेश जैस्वाल
ज्योतिबा चव्हाण
रोहित परब
अॅलेक्स कुरिया
हिलोनी देढीया
चंदन गणेश सिंह
मोहम्मद शकील
Have ordered a high level enquiry headed by the Chief Safety Officer, Western Railways.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) September 29, 2017
Compensation of 5 Lakhs each will be given to kin of those dead.State Govt will bear medical expenses of injured: Vinod Tawde,MH minister pic.twitter.com/vxMGF820m4
— ANI (@ANI) September 29, 2017
Enquiry will be conducted by Maha Govt & Railways Ministry and necessary, strict action will be taken: CM Devendra Fadnavis #MumbaiStampede
— ANI (@ANI) September 29, 2017
Overcrowding lead to stampede. 22 bodies recovered so far, 30 ppl injured: Additional Commissioner of Police, Central Region #MumbaiStampedepic.twitter.com/vd0xUMziwq
— ANI (@ANI) September 29, 2017