पाल्याच्या सुरक्षेसाठी पालकांची सह्यांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:10 AM2017-08-14T06:10:15+5:302017-08-14T06:10:18+5:30

शाळा हे विद्येचे मंदिर आहे, हे मानून पालक विश्वासाने मुलांना शाळेत एकटे सोडतात.

Parental involvement campaign for child protection | पाल्याच्या सुरक्षेसाठी पालकांची सह्यांची मोहीम

पाल्याच्या सुरक्षेसाठी पालकांची सह्यांची मोहीम

Next

मुंबई : शाळा हे विद्येचे मंदिर आहे, हे मानून पालक विश्वासाने मुलांना शाळेत एकटे सोडतात. पण गेल्या काही महिन्यांत शाळांमध्येच लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे मुलांसाठी शाळा सुरक्षित करा, या मागणीसाठी रविवारी दुपारी मुंबईतल्या विविध शाळांतील पालक शिवाजी पार्क येथे एकत्र आले होते. येथे सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
गेल्या आठवड्यात मुंबईत एका चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. अशा अनेक घटना राज्यभरातील शाळांमध्ये घडत असतात. या घटनांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. सर्व मुलांसाठी शाळा सुरक्षित असल्या पाहिजेत, असे पालकांचे मत आहे. यासाठीच मुंबईसह पुण्यातही आज पालक एकटवले होते.
राज्यभरातून सह्यांची मोहीम राबविली जाणार असून सरकारकडे या मागण्या पाठवण्यात येणार असल्याचे इंडिया वाइड पेरेन्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी सांगितले.

Web Title: Parental involvement campaign for child protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.