Join us

आरटीई प्रवेशासाठी पालक पाहत आहेत शाळेच्या एसएमएसची वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 2:47 AM

शाळांकडून मेसेजेस न आल्यामुळे निवड होऊनही आपल्या मुलाचा शाळेत प्रवेश होईल की नाही याची धास्ती आता पालकांनाही वाटू लागली आहे.

मुंबई : राज्य सरकारने २0२0-२१ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार शाळांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी तारीख पाठवायची असून प्रवेश निश्चिती करून घ्यायची आहे. मात्र निवड झालेल्या निम्म्याहून अधिक मुलांच्या शाळांनी अद्याप पालकांना शाळेत कागदपत्रे घेऊन येण्यासाठी आणि प्रवेशनिश्चिती करण्यासाठी मेसेज पाठविले नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. शाळांकडून मेसेजेस न आल्यामुळे निवड होऊनही आपल्या मुलाचा शाळेत प्रवेश होईल की नाही याची धास्ती आता पालकांनाही वाटू लागली आहे.मुंबई विभागात तर निवड झालेल्या ५,३७१ विद्यार्थ्यांपैकी २८६ विद्यार्थ्यांनाच केवळ तात्पुरते प्रवेश मिळाले आहेत. अद्याप ३,१८0 शाळांनी प्रवेशनिश्चितीसाठी पालकांना तारीखच दिली नाही, तर २,१९१ शाळांनी तारीख दिली असली तरी पालकांकडून प्रवेशनिश्चिती झाली नाही. मुंबईप्रमाणे राज्याचेही चित्र असेच असल्याच्या तक्र ारी इतर जिल्ह्यांतील पालकांनी केल्या आहेत.लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था बंद आहेत; मात्र आरटीई प्रवेशांतर्गत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी या कारणास्तव शाळांना पालकांना शाळेत येऊन प्रवेशनिश्चितीसाठी तारीख देण्याच्या सूचना शिक्षण विभागामार्फत करण्यात आल्या आहेत. यादरम्यान पालकांना बोलावलेल्या तारखेला शाळेत जाऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा स्तरावरच प्रवेशनिश्चिती करायची आहे. मात्र मुंबई विभाग रेड झोनमध्ये येत असल्याकारणाने अद्याप अनेक शाळांनी पालकांना प्रवेशनिश्चितीच्या तारखा देण्यास टाळाटाळ केली असल्याचे समोर येत आहे. अशा शाळांनी पालकांना लवकरात लवकर मेसेजेस पाठवून प्रवेश निश्चित करण्याच्या तारखा द्याव्यात आणि प्रवेश निश्चित करून घ्यावेत, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.मुंबई विभागात आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ५,३७१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यातील ४,0५३ विद्यार्थी पालिका विभागातील तर १,३१८ विद्यार्थी मुंबई उपसंचालक विभागाच्या कक्षेत येणाºया शाळांतील आहेत. मुंबई पालिकेच्या एकूण शाळांपैकी १,५५७ शाळांनी पालकांना प्रवेशनिश्चितीसाठी तारखा दिल्या आहेत तर अद्याप २,४९६ शाळांनी त्या दिल्या नाहीत. याच प्रकारे मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत येणाºया शाळांपैकी ६३४ शाळांनी आतापर्यंत तारखा दिल्या आहेत.प्रवेशनिश्चितीची सूचनामुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत येणाºया शाळांपैकी ६३४ शाळांनी आतापर्यंत तारखा दिल्या आहेत तर ६८४ शाळांनी अद्याप पालकांना कोणतीही सूचना दिली नाही. यामुळे मुंबई पालिकेतील १९६ तर उपसंचालक कार्यालयातील कार्यक्षेत्रातील ९0 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. शाळांनी पालकांना मेसेजेस पाठवून विद्यार्थ्यांची प्रवेशनिश्चिती करून घ्यावी; अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्याआहेत.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रशिक्षणशाळामुंबई