क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी, शार्दुल मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 10:58 AM2018-05-09T10:58:01+5:302018-05-09T10:58:01+5:30

क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

parents of cricketer shardul thakur got injured in an accident | क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी, शार्दुल मुंबईकडे रवाना

क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी, शार्दुल मुंबईकडे रवाना

googlenewsNext

मुंबई- भारतीय क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मोटारसायकलवरून जात असताना अपघात झाला आहे. केळवा-माहीम रोडवर या दोघांचा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. शार्दुल सध्या पुण्यात आहे , चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतोय. शार्दुल मुंबईकडे निघाल्याची माहिती मिळते आहे.  

एका लग्नसमारंभातून परतत असताना शार्दुलचे वडील नरेंद्र ठाकूर व हंसा ठाकून यांच्या गाडीला अपघात झाला. रस्त्यावर गाडी घसरल्याने गाडीवरून पडून ते दोघे गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर तेथिल लोकांनी त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. 



 

शार्दुर ठाकूर सध्या आयपीएलसाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघातून खेळतो आहे. शार्दुल ठाकूर त्याच्या साध्या राहणीमानासाठी ओळखला जातो. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यावर घरी जाण्यासाठी शार्दुलने रेल्वेतून प्रवास केला होता. त्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला. 

Web Title: parents of cricketer shardul thakur got injured in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.