शिक्षणाचे व्यावसायिकरण थांबविण्यासाठी पालक दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:18 AM2017-12-27T05:18:35+5:302017-12-27T05:18:43+5:30

मुंबई : गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. चांगल्या बदलांबरोबरच काही वाईट गोष्टींनी या क्षेत्रात डोके वर काढले आहे. शालेय शिक्षणात वाढत चाललेल्या व्यावसायिकरणाचा फटका मोठ्या प्रमाणात पालकांना बसत आहे.

Parents in Delhi to stop the commercialization of education | शिक्षणाचे व्यावसायिकरण थांबविण्यासाठी पालक दिल्लीत

शिक्षणाचे व्यावसायिकरण थांबविण्यासाठी पालक दिल्लीत

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. चांगल्या बदलांबरोबरच काही वाईट गोष्टींनी या क्षेत्रात डोके वर काढले आहे. शालेय शिक्षणात वाढत चाललेल्या व्यावसायिकरणाचा फटका मोठ्या प्रमाणात पालकांना बसत आहे. व्यावसायिकरणाबरोबरच नियमांचे उल्लंघन करणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार न करणे अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी देशभरातील पालक २८ डिसेंबरला राजेंद्र भवन ट्रस्ट, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, माता सुंदरी रेल्वे कॉलनी, नवी दिल्ली येथे एकत्र भेटणार आहेत़ सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पालक विविध विषयांवर चर्चा करणार आहेत, अशी माहिती पालक संघटनेच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी दिली. आंध्र प्रदेश, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश येथील पालक संघटना नवी दिल्लीत एकत्र भेटणार आहेत़
>पालकांच्या प्रमुख मागण्या
शिक्षण क्षेत्रात वाढलेल्या व्यावसायिकरणाला आळा घालणे आवश्यक आहे.
शिक्षणाचे व्यावसायिकरण थांबले पाहिजे.
शुल्क नियंत्रण कायदा राज्य व केंद्र सरकारने राबविला पाहिजे.
देशातील प्रत्येक शाळा ही शिक्षणाच्या अधिकारीखाली आली पाहिजे.
मुलांचे हक्क शाळेत मिळायला हवेत.
पालक शिक्षक संघाचे अधिकार प्रत्येक शाळेत मिळाले पाहिजेत. शाळेच्या कारभारात पारदर्शकता येणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून अग्निरोधक यंत्रणा आणि अन्य सुरक्षेचे उपाय शाळांमध्ये असणे आवश्यक आहे.
‘कॅपिटेशन फी’ शाळांनी आकारू नये़

Web Title: Parents in Delhi to stop the commercialization of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.