Join us

पालकांनो, मुलांना खेळायला पाठवा

By admin | Published: December 25, 2015 2:42 AM

शिक्षण हे महत्त्वाचे आहे, त्यात वादच नाही. परंतु आरोग्य सांभाळले नाही तर आपल्या भविष्याला काहीच अर्थ राहणार नाही आणि त्यासाठीच क्रीडा अत्यंत आवश्यक आहे

रोहित नाईक, मुंबईशिक्षण हे महत्त्वाचे आहे, त्यात वादच नाही. परंतु आरोग्य सांभाळले नाही तर आपल्या भविष्याला काहीच अर्थ राहणार नाही आणि त्यासाठीच क्रीडा अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांना लहानवयापासूनच खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यातूनच भविष्यातील आदर्श नागरिक घडतील, अशा शब्दांत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी पालकांना आवाहन केले.नेरुळ येथील डीवाय पाटील स्टेडियममध्ये गुरुवारपासून ‘स्पोटर््स फॉर आॅल’ अंतर्गत आंतर शालेय क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली. यावेळी पहिल्या दिवशी पाटील यांनी ‘लोकमत’शी बातचीत केली. शालेय विद्यार्थी देशाचे भविष्य असून त्यांच्या प्रगतीमध्ये क्रीडा अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक प्रगत देशाकडे पाहिल्यास जाणवेल की ते देश क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहेत. त्यांच्याकडे क्रीडा संस्कृती खोलवर रुजली असून आपल्याकडेही क्रीडा संस्कृतीची गरज आहे. उत्कृष्ट शैक्षणिक पात्रतेला क्रीडा कामगिरीची जोड मिळाल्यास आपण नक्कीच एक आदर्श नागरिक घडवू शकतो. त्यामुळेच पालकांनी आपल्या पाल्यांना क्रीडासाठी प्रोत्साहन द्यावे, असे पाटील यांनी सांगितले.स्पोटर््स फॉर आॅल स्पर्धेविषयी पाटील म्हणाले की, स्पोटर््स फॉर आॅल खरंच खुप चांगला उपक्रम आहे. स्थानिक पातळीवर अत्यंत चांगल्या प्रकारे स्पर्धा आयोजनाची आवश्यकता होती जे या स्पर्धेद्वारे झाले आहे. आज इतर आंतरशालेय स्पर्धेत जेव्हा खेळाडू खेळतात तेव्हा त्यांना पुरेसे सोयी सुविधा उपलब्ध होत नाही. स्पर्धा आयोजनामध्ये व्यावसायिकता व सोयी सुविधा असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे मुलांमध्ये खेळण्याबाबत प्रचंड उत्साह असतो, मात्र त्यांच्याकडे सोयी सुविधांची कमतरता असते. या स्पर्धेसाठी आयोजकांनी डीवाय पाटील स्टेडियम निवडल्याचा आनंद आहे. आज आम्ही जे रोपटे लावले आहे त्याचे भविष्यात नक्कीच वृटवृक्षात रुपांतर होईल, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.