Join us

त्या ६५ विद्यार्थ्यांच्या पालकांचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:07 AM

मुंबई : अकरावीचे प्रवेश अचानक रद्द झालेल्या ६५ विद्यार्थ्यांच्या पालकांचे बेमुदत आंदोलन अजून सुरूच आहे. आता त्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या ...

मुंबई : अकरावीचे प्रवेश अचानक रद्द झालेल्या ६५ विद्यार्थ्यांच्या पालकांचे बेमुदत आंदोलन अजून सुरूच आहे. आता त्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री मुंबई उपसंचालकांना पालकांनी संपर्क केला असता आपण लवकरात लवकर यावर निर्णय देऊ, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दिली आहे.

कन्सेंट फॉर्म (संमतीपत्र) नसल्याने अकरावीच्या ६५ विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश रद्द करण्याचा प्रकार मुंबईतील चेंबूर येथील एनजी आचार्य आणि डीके मराठे कनिष्ठ महाविद्यालयात घडला आहे.

मात्र अद्याप विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील आणि पालक, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासमोर आंदोलन सुरू ठेवले आहे. अकरावी प्रवेशप्रक्रिया संपलेली असताना महाविद्यालयाने एकाएकी प्रवेश रद्द झाल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड संभ्रमात आहेत व हवालदिल झाले आहेत. जी प्रक्रिया किंवा कारणामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत त्याची कारणे महाविद्यालय प्रशासनाने लिखित स्वरूपात द्यावीत, अशी मागणी पाटील आणि इतर पालकांकडून करण्यात आली.