माता, बालकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रशिक्षण द्या - आरोग्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 06:26 AM2018-09-09T06:26:06+5:302018-09-09T06:26:10+5:30

दूरशिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्यकर्मींना माता आणि बालकांच्या आरोग्य सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी ‘सिंगहेल्थ’ या संस्थेने प्रशिक्षण राबवावे, अशी अपेक्षा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई यांनी आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.

Parents, train them to provide better healthcare - Health Minister | माता, बालकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रशिक्षण द्या - आरोग्यमंत्री

माता, बालकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रशिक्षण द्या - आरोग्यमंत्री

Next

मुंबई : दूरशिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्यकर्मींना माता आणि बालकांच्या आरोग्य सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी ‘सिंगहेल्थ’ या संस्थेने प्रशिक्षण राबवावे, अशी अपेक्षा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई यांनी आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र मुंबई यांनी ‘आरोग्य सेवा आणि कार्यकारी नेतृत्व’ या विषयावर राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हे प्रशिक्षण राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र आणि ‘सिंगहेल्थ’ या सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यातील ३३ जिल्हा शल्य चिकित्सक आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक सहभागी झाले.
कार्यक्रमाचे संयोजक डॉ. दीपक राऊत यांनी देशातील सध्याच्या आरोग्यसेवेची माहिती दिली आणि देशात आरोग्यवर्धक सेवा देणाऱ्या रुग्णालयांची गरज असल्याचे सांगितले. ‘सिंगहेल्थ’च्या वरिष्ठ संचालक विजया राव यांनी सिंगापूरच्या आरोग्यसेवेची माहिती दिली. राज्यातील आरोग्य कर्मचारी वर्गालाही प्रशिक्षण देण्याचे आश्वासनही दिले. दरम्यान, शासनाच्या आरोग्य विभागाने मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्याने अनेक कार्यक्रम राबवून सार्वजनिक आरोग्य समस्या सोडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

Web Title: Parents, train them to provide better healthcare - Health Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.