Join us  

...हे तर समस्यांचे पार्क !

By admin | Published: May 07, 2016 1:03 AM

दादरमधील शिवाजी पार्क म्हणजे खेळाडूंसाठीचे नंदनवन. सुटीचे दिवस असल्याने पार्कात टेनिसपासून ते फुटबॉलपर्यंत आणि खो-खो, कबड्डीपासून क्रि केटपर्यंत सर्व खेळांचा सराव नियमित

- महेश चेमटे, मुंबई

दादरमधील शिवाजी पार्क म्हणजे खेळाडूंसाठीचे नंदनवन. सुटीचे दिवस असल्याने पार्कात टेनिसपासून ते फुटबॉलपर्यंत आणि खो-खो, कबड्डीपासून क्रि केटपर्यंत सर्व खेळांचा सराव नियमित सुरू असतो. सद्य:स्थितीत मात्र पार्कचा श्वास विविध समस्यांमुळे गुदमरलाआहे. त्यामुळे शिवाजी पार्क हे समस्यांचे पार्क बनल्याचे स्थानिकांसह खेळाडूंनी ‘लोकमत’कडे बोलून दाखविले.शिवाजी पार्क प्रथमदर्शनी सुस्थितीत असल्याचे दिसून येते, मात्र प्रत्यक्षात मैदानाची तसेच खेळाडूंसाठीच्या सुविधांची परिस्थिती गंभीर आहे. पार्कातील सगळ््यात गंभीर समस्या म्हणजे धुळीचे लोट. मैदानावर हिरवळ नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. धुळीमुळे स्थानिक रहिवासी कमालीचे त्रस्त असतात. त्याचा वृद्ध, आजारी लोक तसेच लहान मुलांना सर्वाधिक फटका बसतो. सध्याच्या पाणी टंचाईच्या परिस्थितीचा विचार केला तरीदेखील आतापर्यंत कधीही पार्कच्या देखरेखीचा गांभीर्याने विचार झालेला दिसत नाही. पार्कात दोन विहिरी आहेत. त्या माध्यमातून हिरवळ टिकवणे शक्य आहे. पण त्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे वास्तव समोर आले. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मैदानात खड्डे करणे तर नित्याचेच झालेले आहे. रंगमंचासाठी खड्डे करण्यात येतात, पण क्रीडा स्पर्धांवेळी रंगमंच उभारण्याची वेळ आल्यास परवानगीसाठी अनेक चकरा माराव्या लागतात, असे मत क्रीडा प्रशिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. शहरातील मैदानांपैकी पार्कात देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याचे दिसून आले. पार्कात खेळण्यासाठी येणाऱ्या विविध संघांना उपलब्ध करून देण्यात येणारे पाणी दूषित आहे. शिवाय उपनगरांतील संघांसाठी उभारण्यात येणाऱ्या तंबंूची देखील दुरवस्था झाल्याचे दिसून आले. या सर्व गैरसोयींचा त्रास खेळाडूंसह त्यांच्या पालकांना देखील सहन करावा लागतो. मैदानात सहा लाइट खांबांपैकी तीन खांब भरदिवसा सुरू असतात. उर्वरित तीन खांबांवरील काही दिवे नादुरुस्त आहेत. या खांबांवर उच्च क्षमतेचे दिवे असल्याने वीज विनाकारण वाया जाते. शिवाय मैदानाच्या काही भागात वाळू जमल्याने क्षेत्ररक्षण करीत असताना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची गरजआझाद मैदानापेक्षा शिवाजी पार्क खेळाडूंच्या दृष्टीने सोईस्कर असल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून महिला क्रिकेट स्पर्धांचे तसेच निवड चाचणीचे आयोजन येथे होते. प्रत्यक्षात पार्कात महिला खेळाडंूसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था नसल्याने पार्कातील शौचालयात गणवेश बदलण्यासाठी जावे लागते. मैदानाच्या सभोवती उभारण्यात आलेली सुरक्षाजाळी देखील बहुतांशी ठिकाणी तुटलेली आहे, तर काही ठिकाणी सुरक्षा जाळीचे केवळ खांब शिल्लक आहेत, असे महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल सावंत यांनी सांगितले.पार्कात खेळण्यासाठी येणाऱ्या विविध संघांना उपलब्ध करून देण्यात येणारे पाणी दूषित आहे. शिवाय उपनगरांतील संघांसाठी उभारण्यात येणाऱ्या तंबंूची देखील दुरवस्था झाल्याचे दिसून आले. सांगितले.