अनधिकृतपणे पार्किंग कराल, तर टायरची हवा होणार गुल

By admin | Published: September 25, 2015 02:42 AM2015-09-25T02:42:31+5:302015-09-25T02:42:31+5:30

रेल्वे हद्दीत अनधिकृतपणे पार्किंग करुन प्रवाशांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांना पश्चिम रेल्वे आरपीएफने (रेल्वे सुरक्षा दल) अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला आहे.

Parking will be done unauthorizedly, while the tire will air | अनधिकृतपणे पार्किंग कराल, तर टायरची हवा होणार गुल

अनधिकृतपणे पार्किंग कराल, तर टायरची हवा होणार गुल

Next

मुंबई : रेल्वे हद्दीत अनधिकृतपणे पार्किंग करुन प्रवाशांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांना पश्चिम रेल्वे आरपीएफने (रेल्वे सुरक्षा दल) अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांच्या टायरची हवा काढून त्यांना अद्दल घडवण्यात येत असून गेल्या पंधरा दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईत शेकडो वाहनांच्या टायरची हवा काढण्यात आल्याचे आरपीएफ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
रेल्वे स्थानक हद्दीत मोठ्या प्रमाणात वाहन चालकांकडून अनधिकृतपणे पार्किंग करण्यात येते. त्यामुळे स्थानकात येणाऱ्या आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अडथळा येतो. तसेच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. पश्चिम रेल्वेवरील बान्द्रा, खार,अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, भार्इंदर, नालासोपारा, विरार स्थानकाबाहेर तर मोठ्या प्रमाणात पार्किंग केले जाते. २0१३ मध्ये पश्चिम रेल्वेवर अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या ३,५१३ वाहनांवर २0१४ मध्ये २ हजार १६0 तर २0१५ आॅगस्टपर्यंत ४ हजार ३८२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे हद्दीत अनधिकृतपणे वाहनांची पार्किंग करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याची काही प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे. याविरोधात पश्चिम रेल्वे आरपीएफकडे तक्रारी आल्याने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले. त्यानुसार अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांच्या टायरची हवा काढण्यात येत असून गेल्या पंधरा दिवसांत शेकडो वाहनांवर अशा प्रकारे कारवाई करण्यात आल्याचे झा म्हणाले. टायरची हवा काढल्याने चालकाला मनस्ताप होतो आणि ते वाहन नाईलाजास्तव गॅरेजमध्ये नेण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यामुळे रेल्वे हद्दीत अनधिकृतपणे पार्किंग बंद होईल आणि अन्य प्रवाशांना त्याचा अडथळाही होणार नाही,अशी आशा आरपीएफकडून व्यक्त करण्यात आली.

Web Title: Parking will be done unauthorizedly, while the tire will air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.