खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसदरत्न पुरस्कार जाहिर

By मनोहर कुंभेजकर | Published: February 21, 2023 02:31 PM2023-02-21T14:31:16+5:302023-02-21T14:32:04+5:30

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसद रत्न पुरस्कार जाहिर झाला आहे.लोकसभेत प्रभावी कामगिरी करतांना त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण  प्रश्न आणि खाजगी विधेयके मांडून आणि त्यावर अभ्यासपूर्ण भाषणे केली.

Parliament Ratna Award 2023 announced to MP Gopal Shetty | खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसदरत्न पुरस्कार जाहिर

खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसदरत्न पुरस्कार जाहिर

googlenewsNext

मुंबई:उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसद रत्न पुरस्कार जाहिर झाला आहे.लोकसभेत प्रभावी कामगिरी करतांना त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण  प्रश्न आणि खाजगी विधेयके मांडून आणि त्यावर अभ्यासपूर्ण भाषणे केली. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, शाळेत भगवद गीतांचे पाठ सुरू करणे, मुलींची लग्नाचे वय वाढवणे अश्या अनेक संवेदनशील मुद्दावर त्यांनी संसदेच्या अधिवेशनात आवाज  उठविला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे ते सुरवातीपासूनच कार्यरत आहेत.

संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल  राज्यमंत्री, संसदीय कामकाज) यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमूर्ती यांच्या सह-अध्यक्षपदी प्रख्यात संसदपटू आणि नागरी समाजाच्या ज्युरी समितीने नामनिर्देशित केले आहे. संसद रत्न पुरस्कार २०२३ साठी लोकसभेतील आठ आणि राज्यसभेतील पाच खासदार. याशिवाय, दोन विभागीय संबंधित स्थायी समित्या  आणि एका दिग्गज आणि प्रतिष्ठित नेत्यालाही विशेष पुरस्कार श्रेणी अंतर्गत नामांकन देण्यात आले आहे. 

लोकसभा ज्युरी समितीने महाराष्ट्रातून उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  शिरुरुचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना यंदाचा २०२३ चा संसद रत्न पुरस्कार जाहिर केला आहे.येत्या दि,२५ मार्चला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचे दिल्लीत वितरण होणार आहे.

या पुरस्काराला मोठे महत्व आहे.माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी देशांतील सर्व पक्षीय उकृष्ट खासदारांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी संसद रत्न पुरस्काराची २०१० मध्ये मुहूर्तमेढ रोवली होती.या समितीत संसदीय कामकाज मंत्री आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश असतो.खासदारांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून सदर
पुरस्कार दिला जातो.

 खा.शेट्टी यांना झालेला कोविड काळ सोडता त्यांची संसदेत १०० टक्के उपस्थिती आहे.सलग उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी राहिली आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून येणारे ते पहिले खासदार आहेत.

१७ व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून हिवाळी अधिवेशन २०२२ संपेपर्यंत प्रश्न, खाजगी सदस्य विधेयके आणि सदस्यांनी सुरू केलेल्या वादविवादांमधील एकत्रित कामगिरीवर हे नामांकन आधारित आहेत. सदस्यांच्या कामगिरीचा डेटा पीआरएस इंडिया, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने प्रदान केलेल्या डेटावरून प्राप्त केला आहे.

खासदार गोपाळ  शेट्टी यांनी बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य नगर येथील एका झोपडपट्टीतून आपले सामाजिक कार्य सुरू केले होते. त्यांनी युवक मंडळ संस्थे मार्फत स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.त्यावेळी भाजप नेते राम नाईक आणि हेमेंद्र महेता यांच्या संपर्कात आले.  सर्वात प्रथम १९९२ ला मुंबई महानगरपालिका निवडणूक लढविली. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.गेली ४५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक,आमदार आणि आता खासदार म्हणून कार्यरत आहे. 

कठोर परिश्रम, नागरिकांसाठी विशेष तळमळ, आगळी वेगळी कार्य पद्धती आणि दुरंदेशी विचार या सर्व गोष्टी मुळे मुंबई महानगरपालिकेत महत्वपूर्ण पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली तसेच उपमहापौर पद ही भूषविले. भारतीय जनता पक्षाचे संघटन बोरिवली मण्डल अध्यक्ष ते मुंबई सचिव आणि मुंबई भाजप अध्यक्ष चे पदावर ही त्यांनी काम करून  पक्ष संघटन मजबूत केले. श्रेष्ठ नगरसेवक पदाचा मान मिळवून गोपाळ शेट्टी तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.

त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली मतदारसंघातून आमदार म्हणून  दोन टर्म त्यांनी मतदार संघात अनेक विकासकामे आणि अनेक उद्यानांची निर्मिती करून  उद्यान  म्हणून आपला ठसा उमटविला.त्यांनी पोईसर जिमखाना, कमला विहार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि वीर सावरकर उद्यान, छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण, झांसी राणी उद्यान असे काही विशाल आणि उल्लेखनीय उद्यान लोकांना समर्पित केले.तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी आणि पहिल्या मजल्यावरील झोडपट्टीवासीयांना घरे मिळण्यासाठी त्यांची लढाई अनेक वर्षे सुरू आहे.

बोरिवली पश्चिम चिकुवाडी येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या  गेल्या  १० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महापालिकेची मदत न घेता खासदार निधीतून १५ एकर  विस्तीर्ण जागेत कमी पैशात साकारले आहे.

कांदिवली पूर्व येथील अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्र संकुल भूखंडावर खा.गोपाळ शेट्टी यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी स्वप्न पाहिले होते. महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडी सरकारच्या आणि प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे २०२१ डिसेंबर पासून या ऐतिहासिक कार्यात विलंब झाला.  राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा सरकारने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी प्रतिमा स्थापन करण्यासाठी परवानगी दिली.दि,१३ ऑगस्ट रोजी
शिल्पकार उत्तम पाचरणे यांनी पुतळा १४.५ फूट उंच आणि १८०० किलोग्रम वजन तसेच ब्राँझ धातूचा बनविलेला  भव्य पूर्णाकृती पुतळा येथे बसवला.

महापुरुष जयंती निमित्त अनेक व्याख्यानमाला आयोजित करून समाजातील प्रत्येक घटकाला भाजपशी जोडून घेण्याचे श्रेय त्यांना आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी महिला आधार भवन चे निर्माण केले आणि आज मिती पर्यंत हजारो महिलांना उत्तर मुंबईत रोजगार उपलब्ध करून देण्याचा श्रेय त्यांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धूर मुक्त भारत योजनेत त्यांनी उत्तर मुंबई धूर मुक्त करून आणि घरा घरात गॅस पोहचवून विक्रम स्थापित केले आहेत.

Web Title: Parliament Ratna Award 2023 announced to MP Gopal Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई