परमार आत्महत्येचे महासभेवर सावट

By admin | Published: October 21, 2015 03:11 AM2015-10-21T03:11:07+5:302015-10-21T03:11:07+5:30

कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांच्या आत्महत्येचे पडसाद मंगळवारी झालेल्या महासभेतही उमटले. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये गोल्डन गँग आणि पालिकेतील अधिकाऱ्यांचा

Parma succumbed to suicide at the General Assembly | परमार आत्महत्येचे महासभेवर सावट

परमार आत्महत्येचे महासभेवर सावट

Next

ठाणे : कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांच्या आत्महत्येचे पडसाद मंगळवारी झालेल्या महासभेतही उमटले. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये गोल्डन गँग आणि पालिकेतील अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याने पोलिसांनी महापालिकेतून स्थायी आणि महासभेचे इतिवृत्तांत तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारच्या सभेवरही साध्या वेशातील पोलीस महासभेवर लक्ष ठेवून होते. तसेच संपूर्ण पालिका आवारालाच एक प्रकारे पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. परंतु, परमार यांच्यावर चर्चा न करता माजी राज्यपाल आणि खासदार प्रा. राम कापसे यांना श्रद्धांजली अर्पण करून ही सर्वसाधारण सभा संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. सूरज यांचा दुखवटा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.
एरवी गोंधळ आणि राडेबाजीत होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सर्वसधारण सभेवर मंगळवारी मात्र परमार यांच्या आत्महत्येचे सावट होते. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही राजकीय मंडळीच्या नावांचा उल्लेख केल्याने पालिकेतील राजकीय वातारवण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी तपासासाठी महासभेचे इतिवृत्त आपल्या ताब्यात घेतले असल्याने लोकप्रतिनिधीची नाहक बदनामी असल्याचा मुद्दा काही राजकीय मंडळीनी उपस्थित केला होता. मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत तो उपस्थित केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)

पोलिसांची उपस्थिती
परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाणे महापालिकेत तळ ठोकून बसलेल्या पोलिसांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेतही हजेरी लावली. त्यांच्या आत्महत्येचा तपास करत असलेले वरिष्ठ अधिकारी स्वत: या सभेत आवर्जून हजर होते. एरवी सर्वसाधारण सभेच्या वेळी बंदोबस्तासाठी येणारे पोलीस यावेळी मात्र तपासाच्या खास उद्देशाने आल्याने लोकप्रतिनिधीही सावध भूमिकेत होते.

Web Title: Parma succumbed to suicide at the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.