परमेश शिवमणी तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे नवे प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 07:30 AM2021-06-10T07:30:24+5:302021-06-10T07:30:44+5:30
Parmesh Sivamani : शिवमणी हे राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, दिल्ली आणि डिफेन्स सर्व्हिस स्टाफ काॅलेज, वेलिंग्टनचे माजी विद्यार्थी आहेत. राष्ट्रपती तटरक्षकपदक, तटरक्षकपदक या पदकांचे ते मानकरी आहेत.
मुंबई : पोलीस महाअधीक्षक परमेश शिवमणी हे तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे नवे प्रमुख असतील. शिवमणी यांनी बुधवारी मावळते प्रमुख ए.पी. बडोला यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.
तीस वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत परमेश शिवमणी यांनी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. ध्वज-अधिकारी असलेल्या शिवमणी यांनी आतापर्यंतच्या सर्वच जबाबदाऱ्या अत्यंत खुबीने पार पाडल्या आहेत. त्यांची कारकीर्द ही त्यांच्या सागरी कौशल्याची साक्ष देणारी आहे.
नेव्हिगेशन विषयातील ते तज्ज्ञ असून, तटरक्षक दलाच्या आघाडीच्या नौकांचे त्यांनी सारथ्य केलेले आहे. यासोबतच तटरक्षक दलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख, सागरी सुरक्षा आणि अभियानाचे उपमहासंचालक, राजधानी दिल्लीतील तटरक्षक दलाच्या मुख्यालयात अभियानाचे मुख्य संचालक, अशा महत्त्वपूर्ण पदांवरही त्यांनी काम केले आहे.
शिवमणी हे राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, दिल्ली आणि डिफेन्स सर्व्हिस स्टाफ काॅलेज, वेलिंग्टनचे माजी विद्यार्थी आहेत. राष्ट्रपती तटरक्षकपदक, तटरक्षकपदक या पदकांचे ते मानकरी आहेत.