विडंबन कवितांची अभिवाचन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:07 AM2021-07-31T04:07:27+5:302021-07-31T04:07:27+5:30
मुंबई : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १३ ऑगस्ट रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून 'झेंडूची फुले' या त्यांच्या संग्रहातील ...
मुंबई : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १३ ऑगस्ट रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून 'झेंडूची फुले' या त्यांच्या संग्रहातील विडंबन कवितांची अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दादरच्या आचार्य अत्रे कट्ट्याने व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत रसिक स्पर्धकांनी तीन मिनिटांपर्यंतच्या एका विडंबन कवितेचे अभिवाचन स्वतःच्या माहितीसह व्हिडिओद्वारे ०९७५७४३६७५८ या व्हॉटस्ॲप क्रमांकावर पाठवायचे आहे. स्पर्धेची अंतिम तारीख ८ ऑगस्ट असून, १३ ऑगस्ट रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके, आचार्य अत्रेलिखित पुस्तकांच्या माध्यमातून दिली जाणार आहेत.
मराठी कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई : अभिनेत्री सुरेखा कुडची, अभिनेते संभाजी तांगडे व गीतकार-लेखक बाबासाहेब सौदागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागात प्रवेश केला. सुरेखा कुडची यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी, संभाजी तांगडे यांची मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी आणि बाबासाहेब सौदागर यांची खान्देश विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कलाकारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.