- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पॅरोल रजेवरील फरार आरोपीला शुक्रवारी कानपूरमधून अटक करण्यात आली. ही कारवाई क्राईम ब्रांचच्या कक्ष नऊने केली आहे. आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.येतेंद्रसिंग चौहान असे आरोपीचे नाव आहे. २००६ साली वांद्रे परिसरात चंद्रप्रताप सिंग याची चौहानने किरकोळ कारणावरून गोळी घालून हत्या केल्याप्रकरणी त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तो नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता. जून २०१४ मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला. मात्र नंतर तो कारागृहात परतलाच नाही. त्याचा शोध पोलीस घेत होते. त्याचे कुटुंब गोरेगावहून वरळीला राहायला गेले. चौहान कानपूरच्या पीसीओमधून घरच्यांना फोन करतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली. त्यानुसार त्यांचे एक पथक कानपूरला गेले. तेथील तक्षशीला इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो सुरक्षारक्षकाचे काम करत असल्याचे कळले. शाळेत त्यांनी चौहानचा फोटो प्रत्यक्षदर्शींना दाखवला. त्यांनी त्याला ओळखल्यानंतर सलग आठ दिवस सापळा रचून चौहानला अटक केली.
पॅरोलवरील फरार आरोपीला अटक
By admin | Published: July 16, 2017 1:03 AM