Join us

पारशी समाजाच्या पाऊलखुणा

By admin | Published: July 26, 2015 3:39 AM

मुंबईच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या विकासात पारशी समाजाचा मोठा वाटा आहे. मुंबापुरीच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता.

- स्नेहा मोरेमुंबईच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या विकासात पारशी समाजाचा मोठा वाटा आहे. मुंबापुरीच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र या समाजाची लोकसंख्याच कमी होत असल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या समाजाला गौरवशाली इतिहास आहे.म्युझियममध्ये प्रथम अल्पाईवाला यांचे उत्कृष्ट व्यक्तिचित्र पाहायला मिळते. जुन्या पारशी लोकांच्या वापरातील अनेक वस्तूही पाहता येतात. इ.स.पूर्व ४०० वर्षांपूर्वीचे प्राचीन अवशेष येथील पहिल्या दालनात पाहायला मिळतात. त्यात टेराकोटामधील लघुशिल्पांचा समावेश आहे. या समुदायात विविध पद्धतीने मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते. त्याचे निरीक्षण येथील अवशेषांवरून करता येते. १९८१ साली या म्युझियमचे नूतनीकरण करण्यात आले. या ठिकाणी पारशी समाजातील थोर व्यक्तींची व्यक्तिचित्रे आहेत. मुंबईच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या विकासात पारशी समाजाचा मोठा वाटा आहे. या समाजाला गौरवशाली इतिहास आहे. मात्र त्याचे कोणतेही संग्रहालय उपलब्ध नाही. त्यामुळेच त्यांचा इतिहास समाजातील नव्या पिढीसाठी अमूल्य आहे. याचाच विचार करून फ्रामजी दादाभॉय अल्पाईवाला यांनी १९५१ साली पारशी म्युझियमची स्थापना केली. ग्रँट रोड केम्स कॉर्नर येथील खारेघाट लेनमधील पारशी कॉलनीमध्येच हे म्युझियम वसलेले आहे. अल्पाईवाला यांना प्राचीन व जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. त्याच छंदातून त्यांनी भरपूर वस्तू गोळा केल्या होत्या. त्यात जमशेदजी जिजिभाय यांनी वापरलेले चांदीचे घड्याळही आहे. हाच वस्तूंचा संग्रह पारशी समाजाच्या इतिहासाचा साक्षीदार ठरू शकतो, हे त्यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पारशी पंचायतीला ते सांभाळण्याबद्दल सुचविले. परंतु, पंचायतीला बऱ्याच विनवण्या केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद आला. खारेघाट मेमोरिअल बिल्डिंगमध्ये हे संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.१९५१ साली या म्युझियमचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर म्युझियम सुरू होण्यापूर्वीच ६ सप्टेंबर १९५२ रोजी अल्पाईवाला यांचे निधन झाले. त्या वेळी पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. जमशेद ऊनवाला यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आणि म्युझियम प्रत्यक्षात साकारले. त्यांच्यामुळे इराणमधील सुसा या प्राचीन ठिकाणच्या उत्खननामध्ये सापडलेल्या अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत. म्युझियममध्ये पर्शिया येथील उत्खननातून मिळालेले भांड्यांचे अवशेष व काही भांडीही आहेत. तसेच इराणमधील येझ येथील त्या काळातील अवशेष मांडण्यात आले आहेत. भारतात आल्यानंतर पारश्यांनी त्यांच्या वास्तूंच्या भोवती तटबंदी उभारली. या तटबंदीचे काही दरवाजेही पाहायला मिळतात. मुंबईची काही दुर्मीळ छायाचित्रेही आहेत. या म्युझियममध्ये गेली अनेक वर्षे डॉ. निवेदिता मेहता क्युरेटर म्हणून काम सांभाळत आहेत. पुरातत्त्वशास्त्रतज्ज्ञ असणाऱ्या मेहता म्युझियम संग्रह वाढविण्यासाठी मेहनत घेत आहेत. पारशी समाजाचा प्रवास लोकांना पाहता यावा, यासाठी त्या अहोरात्र झटत आहेत.