मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 08:38 PM2017-09-25T20:38:35+5:302017-09-25T20:49:13+5:30

मुंबईतील नेपियन्सी रोडवर चार मजली इमारतीचा काही भाग आज संध्याकाळच्या सुमारास कोसळला.

A part of the four-storey building collapsed in Mumbai | मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला

Next

मुंबई, दि. २५ - मुंबईतील नेपियन्सी रोडवर चार मजली इमारतीचा काही भाग आज संध्याकाळच्या सुमारास कोसळला. मात्र अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. हझिझ हबिब असे या इमारतीचे नाव असून, दुपारच्या सुमारास या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचा काही भाग कोसळला. मात्र वेळीच खबरदारी घेतल्याने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही.  

याआधी मुंबईत मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर 31 ऑगस्ट रोजी भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील 117 वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत 33 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 15 जण जखमी झालेत.  46 जणांना ढिगा-यातून सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले होते.  

इमारतीत तळ मजल्यावर लहान मुलांची नर्सरी शाळा, पहिल्या मजल्यावर चार खोल्या तर इतर माळ्यांवर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण दहा खोल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत नऊ कुटुंब राहत असून, ६० ते ७० लोक होते. इमारत दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव शेजारच्या दोन इमारतींमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे जवान आणि अन्य यंत्रणेने जिकिरीचे प्रयत्न करीत जखमींना सुखरूप बाहेर काढले. म्हाडाने २०११मध्येच ही इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यानंतर ‘सैफी बु-हाणी अपलिफमेंट ट्रस्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट’मध्ये होती. २०१६मध्ये इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र रहिवाशांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला होता.

Web Title: A part of the four-storey building collapsed in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.