Join us

पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:06 AM

रिपब्लिकची टीआरपीसाठी मदतपार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड२८ डिसेंबरपर्यंत गुन्हे कोठडी : रिपब्लिकसह अन्य वाहिन्यांना केली मदतलोकमत ...

रिपब्लिकची टीआरपीसाठी मदत

पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड

२८ डिसेंबरपर्यंत गुन्हे कोठडी : रिपब्लिकसह अन्य वाहिन्यांना केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेला बीएआरसीचा (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता (५५) हा या घोटाळ्याचा मास्टरमाइंड असल्याचे तपासात समोर आले. पदाचा गैरवापर करत त्याने रिपब्लिक टीव्हीसह अन्य वाहिन्यांना टीआरपी वाढविण्यासाठी मदत केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला. शुक्रवारी न्यायालयाने त्याला २८ डिसेंबरपर्यंत गुन्हे शाखा कोठडी सुनावली.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात बीएआरसीचे माजी चिफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) रोमील रामगडिया (४०) यांना मुंबईतून अटक करण्यात आली. रोमील यांनी बार्कमध्ये उपलब्ध गोपनीय, संवेदनशील माहिती ‘एआरजी आऊटलायर’ कंपनीला देऊन रिपब्लिक वृत्त वाहिन्यांचा टीआरपी वाढविण्यास मदत केली.

रोमील आणि दासगुप्ता यांनी संगनमताने हे काम केल्याचे समजताच पथक गोव्याला रवाना झाले. पोलीस मागे लागल्याचे लक्षात येताच दासगुप्ताने तेथून पळ काढला. त्यानंतर ताे पुणे येथे असल्याची माहिती मिळताच, पुण्यातील खेडशिवापूर टोलनाका येथून पथकाने त्याला तपासाअंती ताब्यात घेतले.

......................

.............................

दासगुप्ता हा बीएआरसीमध्ये जून २०१३ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होता. कंपनीत काम करत असताना त्याने पदाचा गैरवापर करत, टीआरपी घोटाळा सुरू केला. तो एआरजी आऊटलायर कंपनीमार्फत प्रसारित होणाऱ्या रिपब्लिक भारत हिंदी, इंग्रजी न्यूज चॅनेलसह अन्य वाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्यात सहभागी होता. गुरुवारी रात्री त्याला या गुह्यात अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २८ तारखेपर्यंत गुन्हे शाखा कोठडी सुनावली आहे. त्यानुसार त्याच्याकड़े अधिक तपास सुरू आहे.

....