‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ लोकमतच्या महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:15+5:302021-07-09T04:06:15+5:30

मुंबई : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...

Participate in the blood donation camp of Lokmat | ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ लोकमतच्या महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा

‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ लोकमतच्या महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा

Next

मुंबई : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ जुलै ते १६ जुलै या कालावधीत लोकमतच्या वतीने ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला महामुंबई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

राज्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा भरून निघावा, तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी राज्यभरात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे मागील वर्षभर राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासत आहे. येत्या काळात रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये, यासाठी राज्याकडे जास्तीत जास्त रक्तसाठा असणे गरजेचे आहे. यासाठी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिराची ठिकाणे

तारीख /उपनगर/ सहयोगी संस्था / पत्ता / वेळ

९ जुलै - बी के सी : भारत डायमंड बोर्स / ट्रेडिंग हॉल (टॉवर एच वेस्ट), भारत डायमंड बोर्स, बी के सी / ९ ते ५

९ जुलै - डहाणू : अदानी डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्र, एडीपीटीसी, डहाणू / अदानी डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्र टेक्निकल ट्रेनिंग सेंटर, डहाणू, पालघर / ९:३० ते ५

९ जुलै - ठाणे : मुकुंद कंपनी अँड टीबीआयए/ फोर्टिस्ट हॉस्पिटल लिमिटेड ब्लड बँक/ मुकुंद लिमिटेड, ठाणे-बेलापूर रोड, दिघे, कळवा, ठाणे / १० ते ५

९ जुलै - रबाळे : टीबीआयए/ एमजीएम ब्लड बँक/ पी-१४, टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, रबाळे/ १० ते ५

-----------------

१० जुलै - जोगेश्वरी पूर्व : दशरथ गुरुनाथ मोरे, अध्यक्ष श्यामनगरचा राजा व्यासपीठ, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शामनगर / शामनगरचा राजा व्यासपीठ, जोगेश्वरी पूर्व / सायंकाळी ५:३०

१० जुलै - दहिसर पूर्व : आर. सी. ठाकूर कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग / गुरुकुल फन झोन, गरीमा सदन, आशिष कॉम्प्लेक्स दहिसर पूर्व / ११ ते ४

१० जुलै - खारघर : श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, सेक्टर ३३, प्लॉट नंबर १, उत्सव चौक - सीआयएसएफ रोड, खारघर नवी मुंबई / ९ ते १

-----------------

११ जुलै - सानपाडा : विजय नाहटा (शिवसेना नवी मुंबई) / चंदन बँक्वेट हॉल, पाम बीच मार्ग, सानपाडा, नवी मुंबई / १० ते ४

११ जुलै - कळंबोली : रामदास शेवाळे प्रतिष्ठान (कळंबोली - पनवेल - शिवसेना) / सुधागड स्कूल कळंबोली / ९ ते ४

११ जुलै - ठाणे पश्चिम : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओवळा माजिवडा विधानसभा / आर. जे. ठाकूर कॉलेज लोकमान्य नगर, ठाणे पश्चिम /१० ते ४

११ जुलै - डोंबिवली पूर्व : राजेश मोरे (शिवसेना शहर प्रमुख डोंबिवली) / शिवसेना मध्यवर्ती शाखा डोंबिवली पूर्व / १० ते ४

११ जुलै - डोंबिवली : खासदार श्रीकांत शिंदे / पलावा क्लब हाऊस, पलावा सिटी डोंबिवली शिळफाटा रोड/ १० ते ४

११ जुलै - भांडुप पश्चिम : राजन दादा गावडे आणि मित्रपरिवार रॉयल महाराष्ट्र युथ फाउंडेशन / गणेश नगर गणेश मंदिराजवळ नवरंग स्टोर भांडुप पश्चिम / ९ ते ४

११ जुलै - मुलुंड पूर्व : चेतन साळवी अध्यक्ष मुलुंड जिमखाना / मुलुंड जिमखाना नवघर रोड, शहानी कॉलनीसमोर दीनदयाळ नगर मुलुंड पूर्व / ८ ते ४

११ जुलै - घाटकोपर पूर्व : गंध कुटी संकल्प समिती / गंध कुटीर विहार, माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व / १० ते ४

११ जुलै - बोरिवली पूर्व : संजय मोदी, हेल्पिंग हॅन्ड्स अँड असोसिएशन विथ समर्पण ब्लड बँक / इम्प्रिंट कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंट जॉन हायस्कूलसमोर, सिद्धार्थनगर लेन, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवली पूर्व / १० ते ४

११ जुलै - दादर पूर्व : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन / संत निरंकारी सत्संग भवन, ५० मोरबाग रोड, नायगाव दादर पूर्व / ९ ते १

११ जुलै - गिरगाव : श्रीकांत तेंडुलकर अध्यक्ष, संजय हरमळकर सचिव, गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळ / सारस्वत समाज हॉल, गिरगाव / १० ते ४

११ जुलै - बोरिवली पश्चिम : आम्ही मावळे / प्रगती स्कूल गोराई, बोरिवली पश्चिम / ९ ते ४

११ जुलै - अंधेरी पश्चिम : रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट / वाय. एम. सी. ए. न्यू लिंक रोड, पोस्ट ऑफिससमोर, मधुबन कॉलनी, डी. एन. नगर अंधेरी पश्चिम / ८:३० ते ३

११ जुलै - जुहू : रोटरॅक्ट क्लब ऑफ मुंबई जेवेल्स / राऊत गल्ली, जुहू तारा, जुहू / १० ते २

११ जुलै - मालाड पूर्व : रोटरॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे, नॉर्थ वेस्ट मालाड, रोटरॅक्ट क्लब ऑफ दहिसर कोस्ट, रोटरॅक्ट क्लब ऑफ घनश्यामदास सराफ कॉलेज / नवजीवन ज्युनिअर कॉलेज, मालाड मतनपूर नगर, मालाड पूर्व / ११ ते ४

११ जुलै - नालासोपारा पूर्व : श्री क्षितिज हितेंद्र ठाकूर, नालासोपारा विधानसभा आमदार, बहुजन विकास आघाडी नालासोपारा / के. एम. पी. डी. स्कूल, तुळींज रोड, नालासोपारा पूर्व / ९ ते ५

११ जुलै - नालासोपारा पश्चिम : श्री क्षितिज हितेंद्र ठाकूर, नालासोपारा विधानसभा आमदार, बहुजन विकास आघाडी / मदर मेरी स्कूल, शांती पार्क, श्रीप्रस्थ, दुसरा रोड, नालासोपारा पश्चिम / ९ ते ५

११ जुलै - बोईसर : रोटरी क्लब ऑफ बोईसर - तारापूर / श्रीराम मंदिर, नवापूर रोड, बोईसर / १० ते ३

येथे संपर्क साधा

‘लोकमत’च्या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी मुंबई महानगर प्रदेशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी रोनाल्ड डिसोझा यांना ९०८२९९६५८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

या संकेतस्थळावर नोंदणी करा

http://bit.ly/lokmatblooddonation

-------------------------------------

Web Title: Participate in the blood donation camp of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.