Join us

स्टार्टअप सप्ताहामध्ये एक हजार ८४६ प्रोजेक्टचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

विजेत्यांना मिळणार १५ लाख; आरोग्यविषयक ३२०, तर शेतीबद्दल २५२ नवसंकल्पनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, ...

विजेत्यांना मिळणार १५ लाख; आरोग्यविषयक ३२०, तर शेतीबद्दल २५२ नवसंकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात देशभरातील १,८४६ स्टार्टअप्सनी नोंदणी केली. त्यामध्ये आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ नवसंकल्पना सादर झाल्या, अशी माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकीय परिसंस्थेला चालना देणे, हा या सप्ताह आयोजनामागील उद्देश असून सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये त्यांच्या नवसंकल्पनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाच्या या चौथ्या आवृत्तीसाठी १२ मे २०२१ पासून www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात देशभरातील स्टार्टअप्सनी अर्ज केले आहेत. २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून १ हजार ८४६ अर्ज प्राप्त झाले असून महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे.

.................................................................................