पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील, युतीच्या घटस्फोटावर एकनाथ शिंदेंचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 05:01 PM2018-05-31T17:01:02+5:302018-05-31T17:01:02+5:30
पालघर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर शिवसेना-भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकांनंतर शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे.
Next
मुंबई- पालघर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर शिवसेना-भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकांनंतर शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. तसेच शिवसेना आणि भाजपामध्ये घटस्फोट होणार असल्याचीही चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात मोठी घोषणा करणार असून, राजकीय वर्तुळाचंही उद्धव ठाकरेंच्या भूमिककडे लक्ष्य लागून राहिलं आहे. त्यातच आता शिवसेनेचे गटनेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना-भाजपा युतीवर सूचक विधान केलं आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. भाजपानं ईव्हीएम मशिन छेडछाड केल्यामुळेच ते विजयी झाले आहेत.