विमानतळावर पार्किंगच्या जागेवर पक्ष कार्यालयांना जागा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:48 AM2018-04-07T03:48:03+5:302018-04-07T03:48:03+5:30
मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या कार पार्किंगच्या जागेवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (एमआयएल) राजकीय पक्षांची कार्यालये उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारच्या सुनावणीत एमआयएएलने पार्किंगच्या जागेवर राजकीय पक्षांच्या कार्यालयासाठी जागा देणार नसल्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले.
मुंबई - मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या कार पार्किंगच्या जागेवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (एमआयएल) राजकीय पक्षांची कार्यालये उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारच्या सुनावणीत एमआयएएलने पार्किंगच्या जागेवर राजकीय पक्षांच्या कार्यालयासाठी जागा देणार नसल्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले.
मुंबई विमानतळावर येणाऱ्या-जाणाºया प्रवाशांच्या तुलनेत कार पार्किंगची जागा कमी आहे. आधीच पार्किंगच्या जागेचा तुटवडा त्यात एमआयएल येथील बहुमजली पार्किंगमध्ये काही व्यावसायिक आस्थापनांना व मनसे, शिवसेना व आता भाजपाच्या कामगार संघटनांच्या कार्यालयाला जागा देत असल्याने अबू आझमी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवर एमआयएएलतर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी एमआयएलने कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयासाठी जागा दिले नसल्याचे न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला सांगितले.
तसेच यापुढेही कोणत्याही राजकीय पक्षाला ही जागा देण्यात येणार नाही, असे आश्वासनही न्यायालयाला दिले. मात्र, कार पार्किंगच्या जागेवर व्यावसायिक आस्थापने असल्याने उच्च न्यायालयाने एमआयएएल व विमानतळ प्राधिकरणाला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.