Join us

"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 5:26 PM

NCP : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा दोन्ही गटांनी साजरा केला, यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील खासदार सुनिल तटकरे यांनी विधानसभा निवडणुकांवरुन नेत्यांना सुनावलं.

NCP ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वर्धापन दिन होतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट वर्धापन दिन साजरा करत आहेत. अजितदादा पवार यांचा मुंबईत वर्धापन दिन सोहळा होत आहे, तर शरद पवार यांच्या गटाचा अहमदनगर येथे वर्धापन दिन सोहळा होत आहे. अजित पवार यांच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जोरदार भाषण केले आहे. तटकरे यांनी झालेली लोकसभा निवडणूक तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. 

"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं

खासदार सुनिल तटकरे यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विधानसभेच्या जागावाटपावर भाष्य न करण्याच्या नेत्यांना सूचनाही दिल्या आहेत. यावेळी तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले, तसेच काल मंत्रिपदावरुन माध्यमात झालेल्या चर्चेवर बोलताना, आमच्यात मंत्रिपदावरुन कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

"मी सही करण्यासाठी फक्त लोकसभेच्या अधिवेशनाला जाणार आहे, माझा कार्यक्रम मी उद्या  ठरवणार आहे. दादा मंत्रालयात आयुष्यभर तुम्ही काम केलं. २०१९ पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार जाईपर्यंत दादा तुम्ही मंत्रालय चालवलं, काही लोक मंत्रालयात आलेच नाही, असा टोलाही सुनिल तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.पक्षाच्या वतीन आम्ही जो कार्यक्रम देऊ त्या कार्यक्रमाला तुम्ही यालच. पण आपल्या सर्व विधानसभा मतदारसंघात अधिवेशनानंतर आपल्याला फिरायचे आहे, अशा सूचना सुनिल तटकरे यांनी नेत्यांना दिल्या. 

सुनिल तटकरेंनी अजितदादांसमोर नेत्यांना सुनावलं

"आपल्या विधानसभा मतदारसंघात अधिवेशनापूर्वी आणि अधिवेशनानंतर फिरायचे आहे. आपल्या ५८ जागा आहेतच आणखी जागेवर ठरेल, हे सर्व मतदारसंघ फिरावे लागतील. आम्ही कार्यक्रम देऊन तेव्हा तुम्हा सगळ्यांना यावेच लागले. प्रफुल्ल भाई तुम्हालाही यावे लागेल, तुम्हाला मी सूचना करणार नाही. विनंती करणार. वयाने मी मोठा आहे पण तुम्ही ज्येष्ठनेते आहात. पण, तुम्हालाही वेळ काढावा लागणार आहे, असंही तटकरे म्हणाले. यावेळी सुनिल तटकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे हात करत १९९९ च्या निवडणुकांची आठवण करत भुजबळ यांना विनंती केली. 

यावेळी सुनिल तटकरे यांनी हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे हात करत सूचना दिल्या. तटकरे म्हणाले, विदर्भापासून सगळीकडेच हल्लाबोल करायला धनंजय मुंडे आहेत. मुश्रीफ साहेब तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फिरावे लागणार आहे, फक्त कोल्हापूरचे नेते नाहीत तुम्हा पूर्ण महाराष्ट्राचे नेते आहात, असंही खासदार सुनिल तटकरे म्हणाले. "कोणीतरी म्हणाले प्रत्येक मतदारसंघात वेगळं नेतृत्व तयार करणार, तुमच्या मुदतीला आम्ही भीक घालत नाही, असं प्रत्युत्तरही सुनिल तटकरे यांनी दिले. 

टॅग्स :सुनील तटकरेराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारशरद पवारनिवडणूक 2024