पार्टीची वेळ अन् जागाच चुकली

By admin | Published: June 28, 2014 12:58 AM2014-06-28T00:58:23+5:302014-06-28T00:58:23+5:30

दुष्काळाचे सावट असताना या जल्लोषाच्या पार्टीत दारूची सोय करणो चुकीचे होते, असे मत काही ज्येष्ठ शिवसैनिकांनीच खाजगीत व्यक्त केले.

Party time and space miss | पार्टीची वेळ अन् जागाच चुकली

पार्टीची वेळ अन् जागाच चुकली

Next
>अंबरनाथ : विजयाचा जल्लोष करणो आणि कार्यकत्र्याना जेवण घालणो चुकीचे नाही, मात्र अंबरनाथच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना या जल्लोषाच्या पार्टीत दारूची सोय करणो चुकीचे होते, असे मत काही ज्येष्ठ शिवसैनिकांनीच खाजगीत व्यक्त केले. ओल्या पार्टीमुळेच शिवसेनेविषयी चुकीचा संदेश गेल्याचे मत काही राजकीय पदाधिका:यांनी व्यक्त केले आहे. 
‘लोकमत’मध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक राजकीय पदाधिका:यांनी पार्टीबाबत नाराजी व्यक्त केली.  अंबरनाथकर पाण्यासाठी तहानलेले असताना दुसरीकडे शिवसेनेचा हा विजयी ‘ओला’ जल्लोष मात्र  चर्चेचा विषय ठरला आहे. संस्कृती जपणारी शिवसेना या पार्टीनिमित्त असंस्कृत कशी झाली, असा सवाल खुद्द काही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.  या पार्टीच्या वृत्तानंतर काही शिवसैनिकांनीच या पार्टीसंदर्भात अधिक माहिती दिली. स्नेहभोजनाचा कार्यक्रम हा 8 वाजता सुरू झाला होता. सुरुवातीला जे पंगतीला होते त्यांना चांगल्या पद्धतीने जेवण मिळाले. मात्र दारू पिणा:यांचा टेबल रंगल्यावर जेवणाचा गोंधळ उडाला. न पाहिलेले असंख्य कार्यकर्तेही आल्याने ही गर्दी अनावर झाली.  ही पार्टी एवढी रंगली की मूळ सत्काराचा कार्यक्रम 12 वाजता  उरकला. त्यानंतरही ठाण्याचे खासदार  येणार असल्याने पुन्हा बडे पदाधिकारी त्यांची वाट पाहत बसल्याने रात्री 2.3क् वाजता पार्टी आटोपली.

Web Title: Party time and space miss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.